खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून  APMC भाजीपाला मार्केट मध्ये लावलेले CCTV पाण्यात.

14
0
Share:

खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून  APMC भाजीपाला मार्केट मध्ये लावलेले CCTV पाण्यात.

नवी मुंबई:  दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ रोजी,  मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समिती येथे भाजीपाला मार्केट मध्ये खासदार  राजन विचारे यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांची तरतुद करुन CCTV कॅमेरे लावण्यात आले होते,  रोज मार्केट मध्ये ६०० ते ७०० गाड्यांची आवक होते,  सुरक्षतेच्या द्रुष्टीकोणातुन २५ लाख खर्च करुन ५७ CCTV कॅमेरे लावण्यात आले होते पण गेल्या काही दिवसांपासून ५७ CCTV कॅमेरांपैकी तब्बल ४२ कॅमेरे बंद आहेत ..
या सर्व प्रकरणावर प्रशासन अधिकारी थंडच नाही तर चक्क पावसामुळे आणि उंदरामुळे कॅमेरे बंद आहेत असे अजब गजब उत्तर देत आहेत . जे CCTV सुरक्षतेच्या द्रुष्टीकोणातुन लावण्यात आले होते ते पर्वनियोजन करुन का नाही लावण्यात आले तसेच लावले तर त्याची जबाबदारी आता कोणाची.  ह्या सर्व प्रकरणातून APMC मार्केटच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

Share: