वेलचीचा सुगंध फिका होणार ,  दरात दुप्पट वाढ 

45
0
Share:

वेलचीचा सुगंध फिका होणार ,दरात दुप्पट वाढ

मसाल्याच्या पदार्थातील राणी म्हणून बाजारात ओळख असलेली वेलची ची बाजारातील आवक कमी झाली असल्याने बाजारात सध्या वेलचीचे दर दुपटीने वाढले आहेत . त्यामुले घाऊक बाजारात १४०० ते १६०० रु किलो असणारी वेलची घाऊक बाजारातच ३००० ते ३५०० रु किलो झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात वेलची ४००० रु किलोच्या घरात गेली आहे.

जेवणाचा किंवा कुठल्याही खाद्य पदार्थाचा सुगंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो .अगदी एक किंवा दोन वेलची नेही एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढतो. त्यामुळे बाजारात वेलचीचा मागणी आहे .त्यातच सध्या तर मुखवास म्हणून हि वेलचीचा मागणी वाढत आहे त्यामुले बाजारात नेहमी वेलची ला चांगला भाव हि मिळतो. मात्र आता तर वेलची चे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुले सणासुदीच्या दिवसात गॉड धोडाचा सुगंध वाढवायचा असेल तर अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
आपल्याकडे केरळ मध्ये वेलचीचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी केरळ मध्ये आलेल्या पूर परिस्थिती मुले इथे सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यात वेलचीच्या बागाही वाहून गेल्या होत्या, त्यामुळे यावेळी मसाल्याच्या हंगामात बाजारात जितकी वेलची ची आवक होणे गरजेचे होते तेवढी झालेली नाहीय त्यामुळे बाजारात सध्या वेलचीची कमी आहे आणि पुढचा उत्पादन होई पर्यंत हि कमी जाणवत राहणार आहे. त्यामुले आता बाजारात वेलचीचे दर दोन हजारावरून चार हजार रुपये किलो वर गेले आहेत. अशी माहिती वेलचीचे व्यापारी कीर्ती राणा यांनी एपीएमसी न्युजला दिली आहे.
Share: