28 लाखाची घड्याळ,कोट्यवधी रुपयेच्या जमीन,रोहित पवार आदित्य ठाकरेपेक्षयाही श्रीमंत

4
0
Share:

मुंबई:पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रही दाखल केलं, ज्यात संपत्ती जाहीर केली. रोहित पवार 18 कोटी 40 लाख रुपयांचे मालक आहेत. विशेष म्हणजे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंपेक्षाही ते श्रीमंत आहेत. आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे.

रोहित पवार यांची संपत्ती

  • रोख रक्कम – 3 लाख 76 हजार रुपये
  • बँक खात्यात – 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये
  • शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक – 9 कोटी 65 लाख रुपये
  • सोनं – 11 लाख 21 हजार (पत्नी आणि कुटुंबाकडे 67 लाखांचं सोनं)
  • चांदी – 47 हजार रुपये किंमत
  • हिरो – 1 लाख 68 हजार रुपये किंमत
  • इतर दागिने – 4 लाख 52 हजार
  • महागडी घड्याळ – 28 लाख रुपये
  • घर, फ्लॅट, शेतजमीन – 5 कोटी रुपये (सध्याच्या बाजारभावानुसार 24 कोटी रुपये किंमत)
  • दुचाकी – 12 लाख रुपये
  • वडिलोपार्जित मालमत्ता – 3 कोटी 46 लाख रुपये
  • बँकेचं कर्ज – 3 कोटी 74 लाख रुपये
  • एकूण संपत्ती – 18 कोटी 40 लाख 45 हजार रुपये (पत्नीकडे 7 कोटी 28 लाख 18 हजार रुपयांची संपत्ती)

आदित्य ठाकरेंची मालमत्ता आणि किंमत

बँक ठेवी – 10 काेटी 36 लाख रुपये

बॉन्ड शेअर्स– 20 लाख 39 हजार रुपये

वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये

दागिने– 64 लाख 65 हजार

इतर – 10 लाख 22 हजार

एकूण – 11 काेटी 38 लाख

दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये

कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे 44 लाख रुपये

Share: