मुंबईकरांना 500 चौरस फूटाचे घर! – राहुल गांधी

5
0
Share:

लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास दहा दिवसांत मुंबईतील झोपडपट्ट्या, जुन्या चाळी-इमारती तसेच एसआरएच्या तसेच जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करून तेथील रहिवाशांना 500 चौरस फूटांचे घर देण्यात येईल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेत दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी हपापलेले असून ते त्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी धुळे येथे झालेल्या सभेत केली

लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास दहा दिवसांत मुंबईतील झोपडपट्ट्या, जुन्या चाळी-इमारती तसेच एसआरएच्या तसेच जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करून तेथील रहिवाशांना 500 चौरस फूटांचे घर देण्यात येईल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेत दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी हपापलेले असून ते त्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी धुळे येथे झालेल्या सभेत केली.

मुंबईतील सभेत गांधी यांनी मोद सरकारच्या “मेक इन इंडिया’ घोषणेची खिल्ली उडविली. ते म्हणाले केंद्र सरकारने “मेक इन इंडिया’ची घोषणा केली, पण अजूनही प्रत्येक उत्पादनावर “मेड इन चायना’चा छाप आहे. कॉंग्रेसचे सरकार “मेक इन मुंबई, मेक इन महाराष्ट्र, मेड इन धारावी’चा आग्रह धरेल.

वस्तू व सेवा करामुळे धारावीतील छोटे उद्योग धंदे करणाऱ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या उद्योगांना संरक्षण आणि मदत मिळायला हवे. मात्र मोदी सरकार श्रीमंताना, उद्योगपतींना मदत करत आहे. त्यांची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Share: