Delhi Election Results :दिल्ली मध्ये पुन्हा आप सरकार.

21
0
Share:

नई दिल्ली:दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवत ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे.  अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.

भाजपला केवळ 08 जागांवरच आघाडी घेता आली, तर काँग्रेसला पुन्हा एकदा शून्यावरच समाधान मानावं लागलं. अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मात्र उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शेवटच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला.

Delhi Vidhansabhe Election Result, Delhi Election Results 2020: दिल्ली ‘आप’ली, केजरीवालांनी सत्ता राखली!

या निवडणुकीत भाजपने जोरदार ताकद लावली होती. 70 जागांसाठी भाजपचे देशभरातील शेकडो खासदार दिल्लीत तळ ठोकून होते. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचा ताफाही दिल्लीत कार्यरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या अनेक सभा झाल्या. पण तरीही भाजपला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नाही.

Delhi Vidhansabhe Election Result, Delhi Election Results 2020: दिल्ली ‘आप’ली, केजरीवालांनी सत्ता राखली!

‘भाजपची प्रगती’

दरम्यान, या निकालाचं विश्लेषण करताना, भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि आपची अधोगती आणि भाजपची प्रगती असं म्हटलं. “आम्हाला मिळालेल्या जागा, समाधानकारक आहेत. मतांची टक्केवारी वाढली आहे. भाजपच्या जागा 3 वरुन 8 झाल्या, म्हणजे भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाली”, असं शेलार म्हणाले. काँग्रेसचा सुपडासाफ झाला, आपची मतं घटली, भाजपची वाढ झाली, मतांची टक्केवारीही वाढली, असं शेलारांनी सांगितलं.

Share: