APMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कित्येक बातम्या दुर्लक्षित होतात परंतु या कृषी उत्पन्न बाजाराचा सहवास आपल्या जीवनात रोज असतो तरीसुद्धा कित्येक बातम्या आपल्याला कळतंच नाही त्यामुळेच आम्ही APMC News. com ची निर्मिती केली आहे.
आज आम्ही एक मर्यादित कक्षेत सुरवात करीत आहोत. आमची मर्यादा आणि आमची दृष्टी नाही  पण संसाधने आहेत. आम्ही एक साधे आवाहन करीत आहोत आमच्या बातम्या/ लेख वाचा, शेअर करा, ट्विट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला पाठवा.