एपीएमसी फळ बाजार परिसरात अपघात एकाचा मृत्यू,एक जखमी,हॉटेलच्या अतिक्रमणाकडेही दुर्लक्ष.

51
0
Share:

नवी मुंबई-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यावसायिकांना बाजारसमितीचे विकास शाखा व सुरक्षा रक्षकांनी अभय दिले आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची परवानगी नसलेल्या स्टॉलचालकांनीही अनधिकृत खानावळ सुरू केल्याने दिसून येत आहेत .


सीसीटीव्ही मध्ये कैद झाले बोलेरो पिकअप या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगार चहा पाजून बसले होते त्याचवेळी एका कामगाराने बोलेरो पिकअप स्टार्ट केला आणि समोर हॉटेलमध्ये घुसला आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाला असून या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते व त्यातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.फळ व भाजीपाला बाजारात महाराष्ट्र तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्यांना तसेच पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून, अपघात घडत आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक नागरिकांची, वाहनांची ये जा सुरू असते, बाजार परिसरात फुटपाथवर असणाऱ्या लक्ष्मी विलास हॉटेल मध्ये काम करणारे कर्मचारी अशोक कुमार प्रसाद, अनिल कुमार प्रजापती, कलामउद्दीन खान, अखिलेश कुमार प्रजापती, हे चौघेजण पदपथावर गप्पा मारत बसले असता, त्यांच्याच ओळखीचा एक जण पीक अप टेंपो उभा करून गेला, मजा मस्ती म्हणून अनिल कुमार प्रजापती हा टेंपोमध्ये जाऊन बसला, व त्याच्याकडून अचानकपणे टेंपो सुरू झाला व पदपथावर जाऊन धडकला,यात कलामउद्दीन व अखिलेशकुमार हे दोघेही गंभीर जखमी झाले. घाबरलेल्या अनिलकुमारने तेथून पळ काढला प्रत्येक्षदर्शीने दोघांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी कलामउद्दिन याला मृत घोषित केले आहे. अखिलेश कुमारवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ए पी एम सी पोलिसांनी अनिलकुमार यांच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे .

यामुळे अशे दिसून येत आहेत बाजार समितीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजार समितीच्या विकास शाखा,सुरक्षा अधिकारी व प्रशासनाच्या वतीने पदपथावर वाटप करण्यात आलेल्या टपऱ्यामध्ये अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने अनधिकृत हॉटेल व इतर व्यवसाय सुरू आहेत.शिवाय प्राप्त टपऱ्याचे बांधकाम करून व वाढवून त्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे.व या गोरखधंद्यात संबधीत व्यक्ती लाखो रुपये कमवित आहेत पण हा कामगारांची मृत्यू चा जबाबदार कोण?

तसेच हॉटेल व टपऱ्या बाहेर गॅस सिलिंडर खुलेआम ठेऊन तिथे अन्न शिजवले जात आहे. निष्काळजीपणा मुळे येथे स्फोट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे.

Share: