आयात केलेली चवळीची माहिती लपवली म्हणून एपीएमसीची दहा कंटेनर वर कारवाई.

5
0
Share:

एपीएमसीला माहिती न देता चवळीच्या दहा कंटेनरचा व्यवहार होत होता यांवर एपीएमसी मार्केट मधल्या तैनात असलेल्या दक्षता पथकाने यांवर कारवाई केली आहे.नियमाप्रमाणे आयात होणाºया कृषी मालाची माहिती बाजार समितीला देणे संबंधित व्यापाºयांना बंधनकारक आहे. परंतु अनेक जण माहिती न देता परस्पर एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये मालाची साठवणूक करत आहेत. २ फेब्रुवारीला प्रशासक सतीश सोनी व सचिव अनिल चव्हाण, विशेष कार्य अधिकारी बी. डी. कामिठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनाथ वाघ व हिंदूराव आळवेकर यांच्या पथकाने एमआयडीसीमध्ये कारवाई केली आहे संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे.

Share: