पशुपालन उद्योगाचा झाला एकात्मिक अभ्यास

25
0
Share:

[12:02, 3/18/2019] Akshay Mankani: अमेरिकेमध्ये प्रामुख्याने मांसासाठी पशुपालन उद्योग प्रचंड मोठा आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता आणि एकूण हरितगृह वायूचे उत्सर्जन हा सर्व पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने काळजीचा विषय आहे. मात्र, त्याची नेमकी विस्तृत आकडेवारी उपलब्ध नाही. उद्योगातील प्रत्येक घटक आणि त्यांचे एकमेेकांवर होणारे गुंतागुंतीचे परिणाम यांची आकडेवारी मिळवण्यासाठी अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील संशोधकांनी पाच वर्षे, सात प्रदेशांमध्ये अभ्यास केला. त्यातून हा व्यवसाय अधिक उत्पादक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे शक्य होणार आहे.

अमेरिकेतील आहारातील प्रथिनांचा मुख्य स्रोत हे जनावरांचे मांस आहे. मांसासाठी पाळल्या जाणाऱ्या जनावरांच्या जीवनसाखळीचे समग्र विश्लेषण अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील संशोधकांच्या गटाने केले असून, त्यासाठी वापरले जाणारे स्रोत आणि त्यातून पर्यावरणात होणा-या उत्सर्जनाची आकडेवारी मिळवली आहे. त्याविषयी माहिती देताना मार्लन इव्ह यांनी सांगितले, की दीर्घकाळापासून मांसासाठी पशुपालनाच्या पर्यावरणावरील विपरीत परिणामांसंदर्भात सातत्याने चर्चा होत आहे. केवळ पशुपालनच नव्हे, तर त्यांच्यासाठी चाऱ्याचे आणि अन्य निविष्ठांचे उत्पादन हेही त्यामध्ये अंतर्भूत होत असते. त्यातच जनावरांच्या पाळण्याच्या व चराईच्या विविध पद्धतीमुळे गुंतागुंत वाढत जाते. पशुपालनातील विविध घटकांचे अचूक सांख्यिकीकरण करून, त्याद्वारे शाश्वततेच्या दृष्टीने अनेक सुधारणा करणे शक्य होऊ शकते.

कृषी अभियंते अॅलन रोट्झ यांच्या गटाने गाईंच्या पालनातील विविध पद्धतीपासून त्यापासून निर्मित उत्पादनांच्या पुरवठा साखळीपर्यंत एकूणच गुंतागुंतीच्या अन्न साखळी प्रणालीचे विश्लेषण केले आहे. पाच वर्षांच्या कालावधीमध्ये, सात पशुपालक प्रदेशामध्ये अभ्यास करताना त्यांनी एकूण २,२७० सर्वे आणि प्रत्यक्ष भेटी दिल्या. सर्वेक्षणामध्ये सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यातून हवामान, माती, उत्पादनाच्या पद्धती आणि अन्य घटकांची भिन्नताही मोजण्यात आली असल्याचे रोट्झ यांनी सांगितले.

२०१३ मध्ये सुरू केलेल्या या विश्लेषणाचे निष्कर्षाचे पहिले दोन भाग जानेवारी २०१९ मध्ये जर्नल अॅग्रीकल्चरल सिस्टिम्समध्ये प्रकाशित केले आहेत.

निष्कर्ष थोडक्यात…

१. अमेरिकेतील सातही प्रांतांतील एकत्रित गायींच्या उत्पादनातून अमेरिकेच्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनाच्या ३.३ टक्के हरितगृह वायू बाहेर सोडला जातो. तुलनेसाठी वाहन आणि विद्युत निर्मिती यामध्ये २०१६ या वर्षी हे प्रमाण ५६ टक्के आणि शेतीमध्ये ९ टक्के इतके होते.
२. गोउत्पादनासाठी वापरले जाणारे खनिज इंधन हे देशभरामध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिज इंधनाच्या १ टक्के आहे.
३. जनावरे २.६ पौंड धान्यांमध्ये जनावरांपासून एक पौंड मांसाचे उत्पादन होते. हे पोर्क (वराह मांस) आणि पोल्ट्री (कोंबडी मांस)शी तुलनायोग्य आहे.
३. अमेरिकेच्या सातही प्रांताच्या तुलनेमध्ये वायव्य आणि दक्षिणी पठारी प्रदेशातील पशुपालनामध्ये पाण्याचा वापर सर्वाधिक (एकूण ६० टक्के) आढळला आहे.
४. पशुपालनासाठी घेतलेल्या पिकांच्या सिंचनाचा विचार केला, तर सर्व प्रदेशामध्ये एकूण पाणी वापराचे प्रमाण ९६ टक्के भरते.

महत्त्वाचे मुद्दे…

आमच्या हरितगृह वायू उत्सर्जनांच्या विश्लेषणातून निघालेले निष्कर्ष हे अन्य विश्वासार्ह अभ्यासापेक्षा फारसे वेगळे नव्हते. मात्र, दीर्घकालीन जागतिक तापमान वाढीमध्ये या घटकांची फारशी भूमिका नसल्याचे रोट्झ यांनी स्पष्ट केले.
एकूण आकडेवारीचा विचार करता पाणीवापर आणि कार्यरत नायट्रोजन ऱ्हास या दोन बाबींमध्ये संभाव्य सुधारणांची गरज आहे. पश्चिमेतील भागामध्ये एकाच भागामध्ये पशुपालन मोठ्या प्रमाणात एकवटल्यामुळे तेथील पाणीवापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कार्यरत नायट्रोजन ऱ्हास १.४ टेराग्रॅम किंवा एकूण अमेरिकेच्या १५ टक्के असून, ते मुख्यतः अमोनियाच्या स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे धुरके (स्मॉग), आम्ल वर्षाव, शैवालांचे प्रमाण वाढणे आणि आरोग्यासाठी अन्य संभाव्य धोक्यांची शक्यता वाढते.
या अभ्यासाचा उद्देश सर्वाधित उत्पादक किंवा कार्यक्षम प्रदेश किंवा पद्धतींचा शोध घेण्याचा नव्हता. मात्र, खनिज इंधन, खाद्य, चारा, विद्युत गरज, पाणी, खते आणि अन्य निविष्ठांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनातून एकूण पशुपालन उद्योग शाश्वततेकडे नेणे शक्य असल्याचे दिसून आले.
शेण आणि मूत्रातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजनचे (अमोनियाच्या स्वरूपात) उत्सर्जन मोजण्यासाठी संशोधकांनी इंटिग्रेटेड फार्म सिस्टिम मॉडेल ही संगणकीय प्रणाली वापरली. त्याचप्रमाणे मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड या तीन मुख्य हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचेही मापन केले.
पुढील सहा महिन्यांमध्ये सर्व निष्कर्षांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यातून ओपन एलसीए म्हणजेच एकात्मिक जन्म ते अंतिम उत्पादन, असे विश्लेषण उपलब्ध होणार आहे. त्यातून राष्ट्रीय पातळीवर मांसासाठी पशुपालन उद्योगांचा निविष्ठा वापर, अर्थशास्त्र, हरितगृह वायूंचे उत्सर्जन यातून होणारे नुकसान हे उपलब्ध होईल. हे मांस सध्या प्रथिनांचा आणि पोषक घटकांचा महत्त्वाचा स्रोत आहे.
[12:03, 3/18/2019] Akshay Mankani: पत्रकारांचीच मुस्कटदाबी

पारदर्शक कारभाराचा ढोल बडवणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाने शुक्रवारी आपल्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे लपवण्यासाठी पत्रकारांचीच मुस्कटदाबी केली. वाहिन्यांसह सर्वच पत्रकारांना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे नवाच वादंग निर्माण झाला.
पालिकेने संरचनात्मक तपासणी केली असतानाही हिमालय पूल पडल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सर्व प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष पालिकेच्या भूमिकेकडे लागले. मात्र पालिका प्रशासनाने पत्रकारांना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी करून आपली हुकूमशाही वृत्ती दाखवून दिली.
दीड वर्षांत पादचारी पुलाच्या तीन दुर्घटना घडल्यानंतर पालिकेने मोठा गाजावाजा करून पुलांची संरचनात्मक तपासणी केली. त्याच्या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीची, पुनर्बाधणीची कामे पालिकेने हाती घेतली होती. तरीही हा पूल पडल्यामुळे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची उत्तरे देण्यास पालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन बांधील असताना शुक्रवारी पालिका प्रशासनाने यापैकी कशालाही सामोरे जाण्याची तयारी दाखवली नाही.
पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पूल विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना भेटण्यासाठी पत्रकारांनी सकाळपासूनच त्यांच्या दालनाबाहेर गर्दी केली होती. मात्र पत्रकारांना त्यांनी आत बोलावले नाही किंवा पत्रकार परिषदही घेतली नाही. इतकेच नव्हे, तर पत्रकारांना आत का सोडले, म्हणून अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी सुरक्षारक्षकांनाच फैलावर घेतले. त्यामुळे दुपारनंतर पत्रकारांना विशेषत: वाहिन्यांच्या पत्रकारांना, कॅमेरामनना पालिका मुख्यालयात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पत्रकार आणि सुरक्षारक्षकांमध्ये मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच वादावादी सुरू होती.
या घटनेनंतर पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर ही बंदी तासाभराने शिथिल केली. मात्र पालिका आयुक्तांच्या दालनाकडे जाणारा मार्ग पत्रकारांसाठी बंद ठेवण्यात आला होता. गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या स्थायी समितीमध्ये हजारो कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले. मात्र त्यात पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव का मंजूर होऊ शकला नाही, या पुलाची संरचनात्मक तपासणी योग्य पद्धतीने झाली होती की नाही, या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक होते. मात्र,पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यातच प्रशासनाने आपली कार्यक्षमता पणाला लावली होती.

Share: