केरळमध्ये Air India Express च्या विमानाला मोठा अपघात,आता पर्यंत 11 जणांची मृत्यू

11
0
Share:

केरळ: केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर आज एक मोठी दुर्घटना घडली . (  Air India Express plane crashes in Kerala)   येथे एअर इंडियाचं विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरलं. धावपट्टीवर विमान घसरल्याने विमान क्रॅश झालं. ही दुर्घटना इतकी भीषण होती की विमान क्रॅश होताच विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून येत होतं. या विमानात 191 प्रवाशी असल्याची माहिती आहे .

दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या AXB1344, बोईंग 737 विमानाने दुबईहून आज (7 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. मात्र, संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांवर रनवेवर लँडिंग दरम्यान हे विमान घसरलं.

डीजीसीएनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचं AXB1344, बोईंग 737 हे विमान दुबईहून कालीकट येथे येत होतं. या विमानात 190 पेक्षा जास्त लोक होते. मुसळधार पावसामुळे रनवेवर उतरल्यानंतर विमान घरसलं आणि खाडीत पडलं. विमानात 189 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांमध्ये 10 लहान मुलांचाही समावेश आहे.
या भीषण दुर्घटनेत विमानाच्या पुढच्या भागाला जास्त नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कोझिकोड एअरपोर्टवर संध्याकाळी पाऊणे आठ वाजताच्या सुमारास घडली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन वैमानकांसह सहा क्रू मेंबर होते.

मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी

काही मीडिया रिपोर्टनुसार, मुसळधार पावसामुळे रनवे जलमय झालं आहे. त्यामुळेच रनवेवरुन विमान घसरलं आणि 30 फूट खोल खाडीत जाऊन पडलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

माहितीनुसार, या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी मल्लापुरम येथून एनडीआरएफची एक टीम कोझिकोडसाठी रवाना झाली आहे. एनडीआरएफच्या 50 जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

या विमान दुर्घटनेत अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी एकच गोंधळ पाहायला मिळत आहे.

Share: