शपथविधी सोहळ्यानंतर अजित पवारांचे ट्विट;

22
0
Share:

शपथविधी सोहळ्यानंतर अजित पवारांचे ट्विट;

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली. त्यांनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोघांचेही ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.

अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माननीय छगन भुजबळजी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
तसेच, अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे अभिनंदन करताना म्हटले की, आज राष्ट्रवादीचे नेते आणि माझे स्नेही जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच देश पातळीवरील अनेक राजकीय नेते या शपथविधीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र विकास आघाडीच्या सहा मंत्र्यांचाही आज शपथविधी झाला. यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा शपथविधी पार पडला.

Share: