अकोल्यात गहू प्रतिक्विंटल १७०० ते १९०० रुपये

106
0
Share:

अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २) गव्हाची ११४० क्विंटल आवक झाली. गव्हाला १७०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

या भागात गव्हाचा हंगाम जोमात सुरू असल्याने बाजारात आवक वाढली आहे. स्थानिक गव्हाच्या जातींची आवक अधिक आहे. सध्या बाजारात गव्हाचे दर समाधानकारक आहेत. अकोला बाजार समितीमध्ये मंगळवारी शरबती गव्हाची १३१ क्विंटल आवक झाली. या गव्हाचा दर २१०० ते २६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ९५० क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचा दर ४४०० ते ५४६० प्रतिक्‍विंटल राहिला. सरासरी ५३०० रुपये दर हातात पडला.

गेले काही महिने जोमात असलेली सोयाबीनची आवक सध्या कमी होऊ लागली आहे. मंगळवारी सोयाबीनची ८१० क्विंटल आवक झाली होती; तर सोयाबीनचा दर ३३५० ते ३७०० रुपये होता. सरासरी ३६५० रुपये मिळाला. हंगाम सुरू असल्याने हरभऱ्याची आवक स्थिर झालेली आहे. मार्च एंडमुळे बाजार समिती बंद राहिल्यानंतर आता पुन्हा व्यवहार सुरू झाले.

बाजार समिती सुरू झाल्यानंतर आवक वाढू लागली. मंगळवारी हरभऱ्याची आवक सर्वाधिक १६८२ क्विंटल झाली होती. हरभऱ्याला ३७०० ते ४४२५ रुपये क्विंटल दर मिळाला. सरासरी ४३०० रुपये दर होता. ज्वारीची आवक ५८ क्‍विंटल; तर दर १८७० ते १९५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २६ क्‍विंटल आवक झालेल्या उडदाला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाला ४००० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

Share: