अनिल अंबानी यांची रिलायन्स दिवाळखोरीत

20
0
Share:

अनिल अंबानी यांची रिलायन्स दिवाळखोरीत

मुंबई: विविध 40 बँकांचे 46 हजार कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे धाव घेतली आहे.

अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर 46 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मालमत्ता विक्रीतून 25 हजार कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता; मात्र हा प्रयत्न फसला. अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे स्पेक्ट्रम विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यातही काही निर्णय झाला नाही.

शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्याने रक्कम उभारण्याबाबत अपयश आल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

राफेल विमान खरेदीप्रकरणात अनिल अंबानी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्दबदली केली, असा आरोप केला जात आहे.
प्रचंड कर्जभार असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीविरोधात स्वीडिश दूरसंचार सामग्री निर्माता ‘एरिक्सन’नेही गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘रिलायन्स’ने सुमारे 550 कोटी रुपये थकवल्याचा दावा ‘एरिक्सन’ने केला होता.

Share: