Apmc Chairman Election: मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदाचा मुकुट कोणाचा डोक्यावर?

20
0
Share:

नवी मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणूक 5 महिने लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला असून येत्या 31 ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे . एपीएमसी येथील प्रशासकीय इमारती मध्ये  निवडणूक पार पडणार असून या साठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या संचालक मंडळाच्या राहण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने वाशी येथील अ‍ॅबॉट हॉटेल बुक केेली आहे, एपीएमसी कडे स्वतःचे गेस्ट हाऊस असताना कोरोना काळात एपीएमसी प्रशासन कडून हॉटेल मध्ये 12 रूम घेण्याचं गरज का होती असे चर्चा बाजार आवारात होत आहे.

मबई एपीएमसी सभापती पदासाठी दोन उमेदवार समोरासमोर. यामध्ये एक आहेत बाळासाहेब सोळसकर, तर दुसरे आहेत सुधीर कोठारी. येत्या 31 अगस्ट रोजी एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे.दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बाळासाहेब सोळसकर, आणि सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांची जोरदार चर्चा आहे. यातील बाळासाहेब सोळसकर हे माजी सभापती होते तर सुधीर कोठारी ह्यांनी हिंगणघाट बाजार समितीचे कामकाज पाहत आहेत.
बाजार समितीमधील 18 सदस्य सभापती व उपसभापती पदासाठी मतदान होणार आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर,सभापती पदासाठी महाविकास आघाडीतर्फे दोन दावेदार आहेत हे दोन्ही दावेदार राष्ट्रवादीचे आहेत दुसरीकडे उपसभापती पदासाठी काँग्रेस व शिवसेना मध्ये लढाई आहे .

सभापती पदासाठी पुणे विभागातून निवडून आलेले साताऱ्याचे बाळासाहेब सोळसकर देखील प्रयत्नशील आहेत.मात्र,त्यांनी सभापतीपदी काम केले असून,त्याच्या कार्यकाळात  मुंबई एपीएमसी मधील 138 कोटी रुपयांची FSI घोटाळा झाला होता त्यामध्ये पूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले होते आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच प्रकरण न्यायालय प्रविष्ट आहे.

मुंबई कृषीउत्पन्न बाजार समितीने  2014 साली 65 कोटीची रक्कम मुदत ठेवीवर ठेवण्याचा प्रस्ताव पास केला हा प्रस्ताव तत्कालीन सभापती आणि सचिव याच्या मंजुरीने करण्यात आला त्यावेळी सभापती हे बाळासाहेब सोळसकर आणि सचिव सुधीर तुंगार हे होते. 65 कोटीची हि मुदत ठेव बाजारसमितीने मलबारहिल च्या देना बँकेच्या शाखेत जमा केले होते. बाजारसमितीच्या आसपास च्या परिसरात 20 पेक्षा अधिक राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी या बँकेत हि मुदत ठेव का ठेवली नाही?सध्या देना बँक मध्ये ठेवण्यात आलेल्या 65 कोटी आता ब्याज पकडून 100 कोटी पर्यन्त पोहचले आहे मात्र 6 वर्ष होउन सुद्धा हाथ खाली हे प्रकरण न्यायालयीन आहे. या सर्व गोष्टी असताना महाविकास आघाडीतर्फे त्यांना विरोध होण्याची शक्यता सूत्रांकडून संगण्यात आलं आहे.
दुसरीकडे जर पाहिलं तर सुधीर कोठारी यांनी वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या हिंगणघाट बाजार समितीचे कामकाज उत्तमरीत्या चालविले असून, राज्यातील आदर्श बाजार समिती म्हणून संबोधली जाते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सभापती व उप सभापती निवडणूकसाठी पोलिसांकडून व्यापक बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले प्रमाणे कॅम्पस मध्ये एक संचालक बरोबर एक व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे ज्या व्यक्तीकडे एपीएमसी कडून देण्यात आलेल्या ओळखपत्र असेल त्यांना आत प्रवेश देण्यात येण्यार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. यात 18 पैकी 16 संचालक राष्ट्रवादीचे आहेत. एक बंडखोर शिवसेना तर 4 काँग्रेस आणि 8 राष्ट्रवादीशी निगडित निवडून आले आहेत. भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही एकही जागा जिंकलेली नाही.फळ मार्केटचे संजय पानसरे बिनविरोध निवडून आले आहेत. तर कामगार प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय 6 महसूल आणि 4 व्यापारी मतदारसंघात हे संचालक निवडण्यात आले आहेत.
एपीएमसीची वार्षिक उलाढाल ही 10 हजार कोटी रुपयांची असल्याने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना रस असतो. या निवडणुकीची सगळी सूत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहेत. तसेच बाजार समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्याने, महाविकास आघाडीचे नेते कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महसूल विभाग विजयी उमेदवार

अमरावती : प्रवीण देशमुख (महाविकासआघाडी) माधवराव जाधव (महाविकासआघाडी)
कोकण विभाग : प्रभु पाटील (अपक्ष) राजेंद्र पाटील (महाविकासआघाडी)
पुणे विभाग : बाळासाहेब सोलस्कर (महाविकासआघाडी) धनंजय वाडकर (महाविकास आघाडी)
नागपूर विभाग : हुकूमचंद आमधरे (महाविकासआघाडी) सुधीर कोठारी (महाविकासआघाडी)
नाशिक विभाग : जयदत्त होळकर (महाविकासआघाडी) अद्वैत हिरे (अपक्ष)
औरंगाबाद : वैजनाथ शिंदे (महाविकासआघाडी) अशोक डक (महाविकासआघाडी)
कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकासआघाडी)
भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष )
दाणा मार्केट : निलेश विरा (अपक्ष)
मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष)
माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे (महाविकास आघाडी)
फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध (महाविकास आघाडी)

Share: