Apmc News:अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार,कोपरखेरने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

51
0
Share:

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
नवी मुंबई : सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असून त्याच्याच वर्गात शिकणारे आहेत. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर खैरणे मधील जिजामाता कॉन्हेन्ट स्कुल मध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेत सहावीत शिकणाऱ्या मुलावर त्याच वर्गातील दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. तर हा प्रकार शाळेतच वर्गात घडला आहे. या घटनेमुळे पिडीत मुलगा मागील तिन दिवसांपासून भयभित होता. अखेर शनिवारी त्याने संपूर्ण प्रकारची माहिती पालकांना दिली असता, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघा मुलांनी पिडीत मुलाच्या गुप्तांगाला चिमटे काढत लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याच्या पार्श्वभागात थर्माकॉल कोंबले. हा प्रकार गुरुवारी घडला असून तेंव्हापासून पीडित मुलगा भयभीत होता.

Share: