Apmc News Breaking:कोल्हापूर कडून मुंबई कडे येणाऱ्या सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने मुंबईला होणाऱ्या गोकुळ दूध पुरवठा बंद

44
0
Share:

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर आला आहे. इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे (गोकुळ) दूध संकलन बंद करन्यात आलेला आहे ,कोल्हापूर कडून मुंबई कडे येणाऱ्या सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठा होणार नाही असे माहिती वाशी येथिल गोकुळ दुधाचे अधिकारी दयानंद पाटील यांनी दिली आहे।

गोकुळकडून दररोज मुंबईसाठी सडे सात लाख लिटर दूधाचे संकलन मुंबई,नवी मुंबई, रायगड,पनवेल भागात होते पण गेल्या काही दिवसात पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने संकलनावर परिणाम झाला आहे.. मात्र, तेही आता पुरामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध संकलन बंद झाल्याने मुंबईतील गोकुळ दूध गराहकाना उदया दुधाचा पुरवठा होणार नाही वाहतूक सुरळीत झाल्यावर दूध पुरवठा होईल।

Share: