Apmc News Breaking: हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी एपीएमसी प्रशासनाकडून कंट्रोल रूमची स्थापना.

5
0
Share:

कोकण आयुक्त शिवाजी दौंड याचा मार्गदर्शनाखाली फळे व भाजीपाला निर्यातीसाठी कंट्रोलरूमची स्थापना.

-एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये कंट्रोलरूम स्थापना.

-कंट्रोलरूम मधून निर्यतदाराला ऑनलाइन पास,वाहतूक व निर्यातीला होणाऱ्या अडथळे दूर 

-कंट्रोलरूमचा कार्यभार नोडल अधिकारी म्हणून पणन अधिकारी भास्कर पाटीलयाची नियुक्ती.

-जेएनपीटी मधून चार दिवसात भाजीपला व फळे निर्यात सुरू होणार

-परदेशात हापूस अंबाचा मागण्या व आंबा शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान रोखण्यासाठी निर्यातीचा सुरुवात

नवी मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग ह्दरून गेले आहे जगातील प्रत्येक गोष्टीवर कोरणाचा प्रादुर्भाव वगायला मिळतोय,भारतातून होणाऱ्या फळे व भाजीपाला निर्यातीवरही परिणाम दिसून येत आहे त्यामुळे आंबा निर्यातदार व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून तुर्भे येथील फळांच्या घाऊक बाजारात 15 ते 20 हजार पेटय़ा कोकणातून येण्यास सुरुवात झाली होती. गुढीपाडव्याच्या मुर्हतावर ही आवक 1 लाख पर्यंत वाढणार असल्याची खात्री व्यापारीवर्गाला होती. मात्र करोनाचा कहर वाढू लागल्याने 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना आंबा बागेलाही टाळा ठोकण्याची वेळ आली ,कोकण आयुक्त शिवाजी दौंडच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी प्रशासक अनिल चव्हाण यांनी हापूस आंब्याच्या बागायतदारना होणाऱ्या नुकसान रोखण्यासाठी आंब्या निर्यातदारांना सोबत घेऊन एक समिती स्थापना करणयात आली आहे त्यामुळे आंब्या बागायतदारना थोडासा दिलासा मिळाले आहे.आंब्या बागायतदार  अनंत चौगले यांनी सांगितले की कोकणातुन  एक ते दिड लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा मुंबईत येण्यास तयार होतो. मात्र बाजारात विक्रीची व्यवस्था नसल्याने त्यांच्यावर हे नवे संकट उभे राहिले आहे. मार्च ,एप्रिल व मे ही तीन आंब्याचे सिजन आहेत यातील मार्च महिना संपलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याकडे फक्त दोंहच महिने शिलक राहिलेने व्यापारी व शेतकरी मध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.
आंब्याची वाहतूक व निर्यात सुरळीत करण्यासाठी कोकण आयुक शिवाजी दौंड यांनी पुढाकार घेऊन  एपीएमसी बाजार प्रशासन कडून एक समिती तयार करण्यात आली आहे.या समितीमध्ये कस्टम,जेएनपीटी,एपीएमसीप्रशासन,पणनअधिकारी,पोलीस,वाहतूक,एमआयडीसी, लॉजीस्टिक ,कस्टम क्लिकअरेन्स  अजेंट ,वाहतूक व निर्यातदार  समावेश आहे.
वाहतूक व निर्यातीत होणारा अडथळा दूर करण्यासाठी या समिती कडून 022-27889191 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.कुठल्याही निर्यातदारला निर्यातीत अडथळा आल्यास या नंबरवर संपर्क करू शकतो, त्यामुळे आंबा विक्री व निर्यतीला दिलासा दायक वातावरण दिसून येत आहे .
दर वर्षी एपीएमसी बाजारात हापूस अंबाची 80 ते 90 लाख पेट्याची आवक होत असते त्यातून 30 टक्के आंबा हा परदेशात निर्यात होत असतो , वाहतूक व निर्यातीतीळ अडथळे दूर झाल्यास कोकणातील आंबा उत्पादकाला दिलासा तर मिळेलच शिवाय कोरोना मुळे लॉक डाऊन मध्ये घरी अडकलेल्याना आंब्याची चब यावर्षी ही घेता येईल।

कोकण आयुक्त शिवाजी दौंड याचा मार्गदर्शनाखाली कंट्रोलरूम स्थापना

एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये कंट्रोलरूम स्थापना.

-कंट्रोलरूम मधून निर्यतदाराला ऑनलाइन पास,वाहतूक व निर्यातीला होणाऱ्या अडथळे दूर .

-या कंट्रोल रूम मधून जेएनपीटी, कस्टम,लाजीस्टिक, वाहतूक पोलीस,पोलीस,आरटीओ,एमआयडीसी ,पणन अधिकारी,एपीएमसी सचिव अधिकाऱ्यांचा समावेश.

-कंट्रोलरूमचा कार्यभार नोडल अधिकारी म्हणून पणन अधिकारी भास्कर पाटीलयाची नियुक्ती.

-चार दिवसात भाजीपला व फळे निर्यात सुरू होणार

-परदेशात हापूस अंबाचा मागण्या व आंबा शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान रोखण्यासाठी निर्यातीचा सुरुवात

-साधारणपणे हापूस अंबाचा आवक 90 लाख पेट्या असतात .

-हापूस आंबा परदेशात 30 टक्के निर्यात होतात,30 टक्के लोकल मार्केट ,30 टक्के राज्यातील बीबीध भागात,10 टक्के प्रोसेसिंग होतात .

-शासनाने घेतलेल्या आंबा निर्यातीचा निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

-हापूस आंब्याचे निर्यातीसाठी कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांचा मार्गदर्शनाखाली एपीएमसी मध्ये कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली या कंट्रोल रूम मधून लवकरात लवकर आंबा निर्यातदार व शेतकऱ्यांना फायदा होईल .

-संजय पानसरे, संचालक, फळ बाजार, एपीएमसी

Share: