Apmc News Impact: मुंबई एपीएमसीतील सर्व बाजार सुरू करा त्याआधी बाजारात राहणाऱ्या कामगार व व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे

22
0
Share:

मुंबई एपीएमसीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दुसरी मोठी झोपडपट्टी पाहायला मिळाली आहे या मध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांना व व्यापाऱ्याना कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आली नाही.

नवी मुंबई:मुंबई एपीएमसीतील भाजीपाला,कांदा बटाटा , मसाला मार्केट शिस्तबद्धरित्या चालू करण्यास बाजार समितीला यश आले आहे.आता बंद असलेल्या फळ व धान्य बाजार सुरू व्हावा म्हणून पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी,माथाडी व बाजार समिती संचालक यांची बैठक घेऊन धान्य मार्केट सुरू करण्याचे आदेश दिले .सर्व बाजारात सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे.गर्दी होता कामा नये,शिस्तीत सर्व व्यवहार झाले पाहिजेत असे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले . फळ व भाजीपाला मार्केट मध्ये जे कामगार व व्यापारी आहेत त्यांना स्क्रीनिग टेस्ट करण्यात येईल जर लक्षणे आढळून आली तर त्यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तला दिले.

याबैठकीला कोकण विभाग आयुक्त शिवजीराव दौंड,खासदार राजन विचारे,माथाडी नेते नरेंद्र पाटील ,ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,बाजार समिती सचिव अनिल चव्हाण,सर्व बाजारपेठेचे संचालक,व्यापारी व माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेया मुंबई एपीएमसीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दुसरी मोठी झोपडपट्टी पाहायला मिळाली आहे या मध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांना व व्यापाऱ्याना कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आली नाही ,

धक्कादायक बाब असा आहे कि व्यापाऱ्याने भाजीपाला व फळ बाजारात त्याचा कार्यलयात व गळ्यामध्ये परप्रांतीय कामगाराना आश्रय दिले आहे या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजारसमितीचे कुठल्याही ओळखपत्र नाही व ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार कामकरतात त्याचे कडे त्याची नोंद नाही . विंदासपणे कामगार मार्केट मध्ये वास्तव्य करीत असून मुक्तपणे फिरत दिसून येत आहे व एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे बाजार आवरत समुह संसर्ग होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे असे बातमी एपीएमसी न्यूज यांनी दिली होती ,बाजारात सोशल डिस्टनसिंग ,व्यापाऱ्याची माल ग्राहक पर्यंत कसे पोहचणार असे विविध मुद्देवर चर्चा झाली. आज बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फळ व भाजीपाला मार्केट मध्ये जे कामगार व व्यापारी आहेत त्यांना स्क्रीनिग टेस्ट करण्यात येईल जर लक्षणे आढळून आली तर त्यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तला दिले.

Share: