Apmc News:कोल्हापूर ,सांगली मध्ये आलेल्या पुराचा फटका कांदा वर , घाऊक मध्ये १८ ते १९ रु किलो 

26
0
Share:
कांदा रडवणार ,घाऊक मध्ये १८ ते १९ रु किलो
नवी मुंबई :  सर्वत्र सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सर्व रस्ते जलमय करून टाकले आहेत. त्यामुळे कृषीमालाच्या गाड्या मुंबई पर्यंत पोहचायला हि अडचण येत आहे. नाशिक मध्ये तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या चाळी मध्ये पावसाचे पाणी साचून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा या हंगामातील पन्नास टक्के कांदा पाण्यात अक्षरक्ष बुडाला आहे.  त्यामुळे  घाऊक कांदा बटाटा बाजारात  मालाची आवक  कमी कमी होत चालली आहे. परिणामी मालाच्या दरात वाढ होत असून यापुढे हि हे दर आणखीन वाढण्याची दाट शक्यता  आहे.  एकंदरीत कांद्याचे भाव वाढणार असून यावर्षी कांदा सर्वाना रडवणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
घाऊक कांदा बटाटा बाजारात नाशिक पुणे जुन्नर ओतूर मधून कांद्याची आवक होत असते . यात सर्वाधिक कांदा हा नाशिक मधून येतो ,नेहमीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज सरासरी शंभर गाड्यां कांद्याची गरज लागते मात्र सध्या हि आवक साथ च्या घरात आहे. आणि 12 ते 15 रु किलो असलेला कांदा १८ ते १९ रु किलो पर्यंत जाऊ लागला आहे. कांद्याच्या बाजारात हि पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने तिथे शेतकऱ्यांचा कांदा पाण्यात अक्षरक्ष सडला आहे. आता तो कांदा फेकून देण्या शिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा उपाय राहिला नाहीय . यामुळे या  यापुढे मुंबईला होणारा कांद्याचा पुरवठा आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, आत्ताच बाजारात कांद्याची आवक सत्तर च्या घरात आहे. ती आणखीन कमी झाल्यास कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून न कापतात पाणी आणणार आहे.
याच प्रमाणे बटाट्याच्या हि सत्तर ऐंशी गाड्या दररोज बाजारात  येणे अपेक्षित आहे मात्र सध्या हि आवक सरासरी  साठ च्या घरात आहे.  त्यामुळे बाजारात बटाट्याची हि कमी आहे. लसणाच्या हि चार पाच गाड्या दररोज येत आहेत. मात्र हि आवक पुरेशी नाहीय.
शिवाय सध्या  पावसामुळे जो काही माल बाजारात येतोय तो सर्व भिजलेल्या  अवस्थेत येतोय त्यामुले आलेला माल जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीय . बटाटा तर बहुतांशी खराब झालेला येत आहे. सध्या  गोडावून मधील बटाटा तसाच काढून गाडीत भरून पाठवला जात आहे त्यामुळे त्या बटाट्याला गाडीत पाणी सुटत आहे आणि तो खराब व्हायला लागत आहे. त्यामुळे बाजारात आल्यावर बटाटा  करून तो  विकावा लागत आहे.
 बटाट्याचे दर हि ९ ते ११ रु किलो झाले आहेत. या पूर्वी  कांद्याचे हे दर १० ते १२ रु होते तर बटाटा ७ ते ८ रु किलो होता. लसूण घाऊक बाजारात ५० ते ८० रु किलो झाला होता तो हि आत्ता ५० ते १०० रु किलो पर्यंत आहे. आता सर्वत्र होत असलेला पाऊस पाहता मालाची आवक अशीच होणार आहे . माल भिजून  बाजारात येत असल्याने त्यातून व्यापाऱ्यांचे नुकसान अधिक होत आहे त्यामुले हा सर्व खर्च काढून व्यापारी मालाची किंमत काढण्याचा प्रयत्न करत आहेत .परिणामी आता बाजारात काही प्रमाणात  तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात मालाचे असलेले हि भाव कमी होण्याची चिन्हे नसून हे दर आणखीन वाढणार असल्याची शक्यता  व्यापारी   सुरेश शिंदे यांनी वर्तवली आहे.
Share: