Apmc News: महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून ,पूरग्रस्त जिल्हे यात्रेतून वगळले

22
0
Share:

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून – पूरग्रस्त जिल्हे यात्रेतून वगळले

नंदुरबार:  मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी असलेली महाजनादेश यात्रेचा पुर्वनियोजित दुसरा टप्पा 5 दिवस पुढे ढकलला आहे . दुसरा टप्पा 21ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असणार असून तो नंदुरबार येथून सुरू होत असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी दिली .

महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे , 55 मतदार संघात जाणार असून यात 39 जाहीर सभा तर 50 स्वागत सभा असणार आहेत . दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार असून समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे . महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार असल्याचे आमदार ठाकूर म्हणाले . सांगली कोल्हापूर येथील पूरस्तिथीमुळे 3 दिवस अगोदरच पहिला टप्पा बंद झाला होता तो आत सुरू होणार आहे

पूरग्रस्त भाग असलेले पुणे सांगली सातारा कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले असल्याची माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी दिली आहे

Share: