Apmc News: वाशी एपीएमसीची प्रशासकीय इमारत धोक्याच्या छायाखाली, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भीतीची सावट,जीव मुठीत घेउन करतात काम

23
0
Share:

-वाशी एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये बीज सुरक्षाचा अभाव
-वाशी एपीएमसीची प्रशाकीय इमारत धोक्याच्या छायाखाल

-अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भीतीची सावट,जीव मुठीत घेउन करतात काम

-कोण रााहणार घडणाऱ्या घटनेला जवाबदार

नवी मुंबई:  वाशी एपीएमसी येथील बाजार समितिच्या प्रशासकीय इमारत समस्यांचे गर्तेत गेले आहे. या चार मजलि इमारतीतून संपूर्ण मुंबई क्षेत्रातील कृषि उपज बाजाराचे नियंत्रण केले जाते. एका वर्षाला दहा कोटीच्या व्यापार होतो.

या प्रशासकीय इमारतीत आई.ए.एस. स्तरातील अधिकारी प्रशासक म्हणून बसतात. सध्या सतीश सोनी या पदावर विराजमान आहे या इमारतीत जवळजवळ 20 ते 25 कार्यालय आहेत. या मध्ये बाजार समितीच्या अभियांत्रिक विभाग, एकाउंट विभाग, रेवेन्यू विभाग, आस्थापना विभाग, प्रशासकीय विभाग ,सुरक्षा विभाग, कर वसूली विभाग, कमीतकमी ८ हजार परवाना विभाग, कांदा-बटाटाच्या प्रशासकीय कार्यालय, सिंडिकेट बैंक आणि अभ्युदय बैंकची शाखा, पोस्टऑफिस, नवी मुंबई पुलिस विभागचे एसीपी कार्यालय आणि एक होटल सुद्धा आहे.


याच इमारतीच्या तल मजल्यावर परवाना विभाग आणि रिकॉर्ड रूम आहे. याच्या ठीक बाजूला इमारतीच्या विद्युत मीटर रूम (कक्ष) आहे. या मीटर रूमची सध्याची स्थिति अत्यंत दयनीय आणि भयावह आहे.

पूर्ण मीटर रूममध्ये वीजेचे सर्व वायर उघडे पडले आहे. कुठल्याही क्षणी येथे ‘शॉर्ट सर्किट’ होवून आग लागू शकते. दुर्दैवानी जर अशा झाला तर रिकॉर्ड रूम मध्ये ठेवले गेले १५ वर्षाचे सर्व दस्ता एवज आणि पेपर, फाईल जळून ख़ाक होणाची शक्यता आहे, या इमारतीत मोठे अधिकाऱ्या बसतात, तरी ही या इमारतीची आणि याचे वीज मीटर रूमची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या बाबत मुख्य प्रशासकीय अधिकारी सतीश सोनी यांनी सांगितले की आम्ही या बाबत लवकरात लवकर सुधारना करू.

Share: