Apmc News:शिरोळ मधील घटनेची वस्तुस्थिती समजून घ्यावी : चंद्रकांत दादा पाटील

19
0
Share:

*शिरोळ मधील घटनेची वस्तुस्थिती समजून घ्यावी : चंद्रकांत दादा पाटील*

शिरोळमधील पूर परिस्थिती बिकट असल्याने मी हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने पाच टन साहित्य घेऊन गेलो होतो. यावेळी शिरोळ येथील काही मदत केंद्रांना भेटही दिली. येथील एका मदत केंद्रावर भेट दिल्यानंतर पूरग्रस्तांना धीर देऊन प्रशासन करत असलेल्या कामांची माहिती दिली. त्याबरोबरच, सर्व पूरग्रस्तांना विनंती केली की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन आपल्या पाठिशी खंबीर पणे उभे आहे. नुसत्या तक्रारी करुन काहीही होणार नाही. तुम्ही आवश्यक त्या सूचना कराव्यात, त्यावर आपण मार्ग काढू. तक्रारी केल्याने काहीच साध्य होत नाही. उलट प्रशासनाचे मनोबल कमी होते. त्यामुळे तक्रारी न करता योग्य त्या सूचना कराव्यात. त्यावर आपण मार्ग काढू.” यावेळी एक तरुण वारंवार उठून व्यत्यय आणत होता. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आपणाला सर्व काही देणार असल्याचेही सांगितले. पण तो हेतूपुरस्सर व्यत्यय आणत होता. ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमात वक्ता आपलं मत मांडत असताना, त्यामध्ये वारंवार कोणी व्यत्यय आणत असेल, तर त्याला शांत बसण्याचीच विनंती वक्ता करतो. तशीच विनंती केली होती. मात्र, सदर तरुणाचा हेतू स्वच्छ नसल्यानेच तो सातत्याने व्यत्यय आणत होता. कोणावरही अरेरावी करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा माझा हेतू कदापि नव्हता, ही वस्तुस्थिती सर्वांनी समजून घ्यावी.

Share: