Apmc News -मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समितीचा अजब -गजब कारभार. 

45
0
Share:

एपीएमसी येथे काम करणाऱ्या एका सहाय्यक सचिवाने  सहकार मंत्री  विमला ताई मुंदडा यांच्या लेटरहेडचा वापर करुन टिकवली नोकरी.

नवी मुंबई :मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समिती येथे १९९२ साली रूजू झालेल्या एका साहाय्यक सचिवाने काही कारणास्तव आपल्या नोकरीचा १९९५ साली  राजिनामा दिला होता.  एकदा राजिनामा दिला की पुन्हा नोकरीवर रूजू होता येत नसल्याने साहाय्याक सचिवाने पुन्हा १९९७ साली सहकार मंत्री विमला ताई मुंदडा यांच्या लेटरहेडवर नियुक्तीची परवानगी आणली.  त्या नियुक्ती  पत्रात असा उल्लेख होता की जेवढे दिवस सहाय्यक सचिव कामावर रूजू नव्हता तेवढे दिवस मेडिकलच कारण दाखवून  आणि पगार कापुन त्याला पुन्हा कामावर रूजू करावे असा उल्लेख होता. पण हे नियुक्ति पत्रात ना नियुक्ती ची तारीख ना जावक क्रमांक नहव्ता. अश्या प्रकारच्या नियुक्ती पत्रावर आदेश आणून आपली नोकरी टिकवणारा अधिकारी मागील २४ वर्षे पासून पदावर कार्यरत आहे . पण ते दोन वर्ष आधिकारी मेडिकल कारण सांगून इतर ठिकाणी नोकरी करत होता.  ह्या सर्व घटनेचा खुलासा APMC न्युज करणार आहे.
अशीच घटना पुन्हा २००५ साली घडली.  2005/6 साली एपीएमसी येथे काम करणाऱ्या लिपिक  कर्मचारी प्रकाश दत्तात्रय तळेकर यांनी तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाचे लेटर हेडचा  वापर करून समितीचा अधिकाऱ्यावर गैर कारभार केल्याचा ठपका ठेउन त्यांचे चौकशी करावी अशी समितीला सूचना केली होती,चौकशी शेवटी  मुख्यमंत्री कार्यालयातून  असा प्रकारच्या कोणतीही सूचना समितीला दिलेल्या नाहीत.अधिक चौकशी केले असता बाजार समितीचा ज्या अधिकाऱ्यां विरोध खोटी तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करावी  असा अधिकाऱ्यावर नाराज असलेल्या पी.डी तळेकर नामक कर्मचाऱ्यांने हे कट कारस्थान केल्याचे सखोल चौकशी नंतर स्पष्ट झाले .
ह्या सर्व प्रकारामुळे मुंबई क्रुषी उत्पन बजार समितीमध्ये असे अजुन किती गैरप्रकार चालत असणार हा प्रश्न ऐरणीवर येतो

Share: