बनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांच्या माध्यमातून पर्दाफाश

9
0
Share:

*बनावट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा ए पी एम सी पोलिसांच्या माध्यमातून पर्दाफाश*

*५ हजार रूपयात बनवुन मिळतं होते बनावट लायसन्स*

*आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक..आणखी आरोपींचा शोध सुरू*

*आरोपी व त्याच्या साथीदारांनी २४५ बनावट लायसन्स लायसन्स बनविल्याचे तपासात निष्पन्न*

*बनवट लायसन्स बनविणाऱ्या टोळीचा ए पी एम सी पोलिसांकडून पर्दाफाश*

ए पी एम सी परिसरात मोठया प्रमाणावर बनावट आर टी ओ एजंट बनावट लायसन्स बनवीत असल्याची माहिती पोलिस नाईक किरण राऊत यांना मिळाली या माहिती संदर्भात खात्री करण्यासाठी पोलीस कर्मचारी जयदीप पवार यांचे लायसन्स कोणतेही कागदपत्रे न देता, आर टी ओ ची कोणत्याही प्रकारची चाचणी न घेता दिलीप वेंकट सुर्यवंशी(२५)कळंबोली, या आर टी ओ एजंट असणाऱ्या भामट्याने ५ हजार रुपये घेऊन बनावट लायसन्स बनवून दिले.

त्याच्याविरोधात ए पी एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपासा दरम्यान सूर्यवंशी १४३ बनावट लायसन्स, २ आधार कार्ड,४ शाळेचे दाखले, पनवेल व ठाणे आरटीओचे दोन गोल रबरी स्टॅम्प, पनवेल आरटीओचा एक चौकोनी स्टॅम्प व एक एस के ट्रुल्स ऍड ट्रॅव्हल्स कंपनीचा स्टँम आढळून आले.तसेच त्याने २४५ बनावट लायसन्स बनविल्याचे निष्पन्न झाले आहे. सुर्यवंशीचा साथीदार डेरील लोबो (५४) कळंबोली याला बनावट स्टॅम्प बनविल्या प्रकरणी व तिसरा आरोपी मोटार स्कुल ड्रायव्हिंग चालक धीरज उर्फ नरेंद्र मौर्या (२५) कळंबोली यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या घटनेचा पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक भूषण पवार करीत आहेत

Share: