जागा आठ हजार आणि अर्ज 41 हजार राज्य परिवहनच्या चालक वाहक पदासाठी पाचपट अर्ज

20
0
Share:

राज्य परिवहन महामंडळामध्ये 8022 जागांसाठी भरती निघाली आहे आणि त्यासाठी आतापर्यंत 41 हजार 717 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह दुष्‍काळी जिल्ह्यातील विभागातील सर्वाधिक उमेदवार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे जागा भरतीच्या पाचपट अर्जामुळे राज्यात किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची प्रचंड भयंकर समस्या आहे याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मेक इन इंडिया, मेकिंग महाराष्ट्र आणि स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली परंतु याचं चित्र आपल्याला या पाच पट अर्जामुळे सगळ्यांना दिसून येत आहे. काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही घटले आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन विभागाने ही भरती काढली आहे.

राज्याची स्थिती
ऐकून जागा ८,०२२
अर्ज। ४१,७१७
महिलांन साठी जागा २,४०६
अर्ज ९५३
अनुसूचित जाती जमाती ६८५
अर्ज २,९७२
Share: