‘बांठीया पँटर्न’ होतोय शेतकऱ्यांसाठी कमालीचा यशस्वी

6
0
Share:

‘बांठीया पँटर्न’ होतोय शेतकऱ्यांसाठी कमालीचा यशस्वी

मुंबई: तलाठयांच्या भरवश्यावर शेती,पिकांच्या प्रमाणाबाबत सोडून दिलेली यंत्रणा आता शेतकऱ्यांच्या थेट सहभागातून पारदर्शक कारभाराचा बांठीया पँटर्न कमालीचा यशस्वी होत आहे.त्यामुळे लाखो शेतकरी या माध्यमातून स्वतःच्या पिकांची स्वतःच आकडेवारी देत असल्याने त्या आधारे नियोजन करणे महसूल कृषी विभागाला शक्य आहे.

वाडा, बारामती, दिंडोरी, अचलपूर,कामठी, फुलंब्री, यानंतर संगमनेर, सेलू,सिल्लोड, या तीन तालुक्यांमध्ये हा
पँटर्न करारानुसार लागू करण्यात येणार आहेत.राज्याचे माजी सचिव जयंतकुमार बांठीया यांची संकल्पना फडणवीस सरकारच्या काळात पाच तालुक्यांमध्ये अंमलात आणली व नंतर त्यात आणखी दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

शेतकऱ्यांवर विश्वास ठेवून शेतीची अचूक माहिती उपलब्ध करणे हा या पँटर्नचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांकडे शेती किती,कोणती पिके किती प्रमाणात घेण्यात येतात.यांची नोंद तलाठ्यांकडून केली जाते.मात्र,तलाठयांवरील कामाचा बोजा असल्याकारणाने प्रत्येक शेतावर जाऊन नोंद करणे शक्य होत नाही.त्यातूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते.

थेट शेतकऱ्यांना या प्रक्रियेत शामिल करून इपीपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक पीक पाहणीचा अनोखा प्रयोग सुरू केला.या मोबाईल अँपद्वारे शेतकरी त्यांच्याकडील पिकांबाबतची माहिती अपलोड करतात आणि ही माहिती कृषी व महसुल विभागाला उपलब्ध होते.खरीप हंगामात केवळ फुलंब्री तालुक्यात 20 हजार हेक्टरवरील पिकांची नोंद करण्यात आली.

Share: