Bharat Bandh: APMC मार्केट मध्ये कडकडीत बंद

18
0
Share:
नवी मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्याा विरोधात झालेल्या देशव्यापी संपात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील माथाडी कामगार व व्यापांºयानी उत्सर्फुतपणे सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. यामुळे मुंबई कृषीउत्पन्न बाजर समितीच्या कांदा बटाटा, फळ, भाजीपाला, मसाला व धान्य अशा पाचही मार्केट मध्ये शुकशुकाट पसरला होता. माथाडी व व्यापारी कामागारांनी एकत्र जमून बाईक रॅली देखील काढली होती.
केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्याात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतक-यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारच्या कामगार,व्यापारी  व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे तमाम माथाडी कामगार भारत बंद मध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,आमदार शशिकांत शिंदे यांच्या असोसिएशने माथाडी कामगारांना या मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पाचही मार्केट मधील माथाडी व व्यापांºयानी यामध्ये सहभाग घेतला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी देशव्यापी संपास मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीने देखील बाजार बंद करणार असल्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बाजारामध्ये कृषी माल पाठवू नये असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार बाजारामध्ये गाडया पाठवण्यात आल्या नाही. लाबपल्ल्यांच्या असणाºया फक्त गाडया बाजारपठेत आल्या एकूण 231 वाहनांची आवक बाजारात झाली होती. भाजीपाला बाजारात 13, कांदा बटाटा मार्केट 39, फळ बाजार मध्ये 43, मसाला मार्केट मध्ये 26, धान्य मार्केट मध्ये 110 गाडयाची आवक झाली. मात्र भाजीपाला व्यतिरिक्त कोणताच माल विक्री करण्यात आला नाही.
कृषी कायद्यााच्या विरोधात एमपीएमसी बाजारात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. या बंदला उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला असून 14 डिसेंबर रोजी माथाडीच्या मागणीसाठी पुन्हा संप पुकारण्यात येणार आहे.
नरेंद्र पाटील, कामागर नेते
भारत बंद मुळे एपीएमसमी मार्केट मध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पाठवू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बाजारपेठेमध्ये लांब पल्याच्या गाडयाव्यतिरिक्त वाहने पाठवण्यात आलेली नाही.
अशोक डक , सभापती मुंबई एपीएमसी
Share: