Apmc भाजीपाला मार्केटमध्ये सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात मोठी वाढ; तर मिरची झाली आणखी तिखट 

24
0
Share:
नवी मुंबई : परतीच्या पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला होता, मात्र त्याचे परिणाम भयंकर उमटताना दिसत आहेत. अनेकांत जिल्याहातील गावांमध्ये पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेकतारी ऐन सणासुदीच्या दिवशी हतबल झाला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये भाजीपाल्याची दरवाढ सुरूच आहे.  सध्या दरवाढीच्या काळात वाटाण्याच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात वाटाणा हा १५० रुपय प्रतिकिलोने विकला जात असून मिरची ही आणखी तिखट झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच मुंबई बाजार समितीमध्ये दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यातच अवकाळी पावसाने भर टाकल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सध्या भाजीपाल्याची आवक देखील कमी झाली आहे. मुंबई बाजार समितीतमध्ये भाजीपाला विक्रीसाठी दररोज ४०० ते ५०० वाहनांची आवक होत असते. मात्र आज फक्त ३७३ गाड्यांची आवक झाली आहे. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणांवरून कृषी माल विक्रीसाठी येत आहे. खरेदीच्या ठिकाणीच मालाची किंमत वाढल्यामुळे बाजार समितीमध्येही दर वाढत आहेत.
सध्या नवी मुंबईत घाऊक बाजारात कोबी ४०, कारली ४०, मिरची ७० ते ८०, शिमला मिरची ७० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तर भेंडी ५०, गवार ६५, टोमॅटो ३५, वाटाणा १५० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती झालेल्या सर्वसामान्यांना आता ऐन सणासुदीच्या काळात दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
Share: