Kolhapur Flood-भाजपा लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

3
0
Share:

भाजपा लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे
प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई:भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भाजपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मा. प्रदेशाध्यक्षांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निधी संकलनाचे आवाहन केले आहे.
त्यांनी सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होणाऱ्या कार्यासाठी भाजपा महाराष्ट्र पूरग्रस्त सहाय्यता संयोजक म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच समितीची स्थापना करण्यात येईल.

Share: