Breaking: कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात स्क्रीनिंग आणि पाळत ठेवण्यासाठी रोबोटिक “कॅप्टन अर्जुन”

4
0
Share:

*मध्य रेल्वेचे इनोव्हेशन – कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात स्क्रीनिंग आणि पाळत ठेवण्यासाठी रोबोटिक “कॅप्टन अर्जुन”

रोबोटिक कॅप्टन अर्जुन प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्यांच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल”.

 

मुंबई: कोविड-१९ पासून प्रवाशांचे आणि रेल्वे कर्मचार्‍यांचे संरक्षण व सुरक्षा करण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेने विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. या लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वेने आपल्या अनेक नाविन्यपूर्ण उपाय योजनांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. रेल्वे सुरक्षा दलाने, पुणे येथे आज तपासणी व देखरेखीची गती वाढवण्यासाठी रोबोटिक ‘कॅप्टन अर्जुन’ (ARJUN- Always be Responsible and JustUse to be Nice) सुरू केले. प्रवासी जेव्हा ट्रेनमध्ये बसतात तेव्हा हा रोबोट स्क्रिन करण्यासाठी आणि असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी लाँच केला गेला.

रेल्वे बोर्डातील आरपीएफचे महासंचालक  अरुण कुमार यांच्या हस्ते आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  संजीव मित्तल, श्अतुल पाठक, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त; श्रीमती रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग; मुख्य सुरक्षा आयुक्त  आलोक बोहरा आणि पुणे विभागीय सुरक्षा कमांडंट  अरुण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी रोबोटिक ‘कॅप्टन अर्जुन’ ऑनलाइन सुरू करण्यात आले. यावेळी  संजीव मित्तल, जनरल मॅनेजर यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नाविन्याची प्रशंसा केली आणि ते म्हणाले, “रोबोटिक कॅप्टन अर्जुन प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्यांच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल”.

कॅप्टन अर्जुन’ हा मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज आहे. संशयास्पद हालचाली आणि असामाजिक हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम वापरतात, त्यात इनबिल्ट सायरन, मोशन अ‍ॅक्टिवेटेड स्पॉटलाइट एच -264 प्रोसेसर आहेआणि नेटवर्क बिघाड झाल्यास रेकॉर्डिंगसाठी अंतर्गत अंगभूत स्टोरेज देखील आहे. ‘कॅप्टन अर्जुन’ थर्मल स्क्रीनिंग करतो आणि ०.५ सेकंदात प्रतिक्रियेसह डिजिटल डिस्प्ले पॅनेलमध्ये तपमान नोंदवितो आणि तापमान संदर्भ श्रेणीपेक्षा जास्त असल्यास विचित्र स्वयंचलित गजर होते, हे मोजणीची क्षमता ९९९ इतकी आहे. ‘कॅप्टन अर्जुन’ने संपर्कासाठी दुहेरी मार्ग स्वीकारले आहेत. व्हॉईस मोड आणि व्हिडिओ मोड तसेच हा स्थानिक भाषेत देखील बोलतो. कोविड-१९ वर जागरूकता संदेश देण्यासाठी यामध्ये स्पीकर्स ठेवलेले आहे. ‘कॅप्टन अर्जुन’कडे सेन्सर-आधारित सॅनिटायझर आणि मास्क डिस्पेंसर देखील आहे आणि त्यांना हलवता येऊ शकते. रोबोटमध्ये फ्लोर सॅनिटायझेशनसाठी बॅटरी बॅकअपसह चांगली सुविधा आहे. याला खडबडीत चाके आहेत जी सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर चालू शकतात.

‘कॅप्टन अर्जुन’ या नावीन्यपूर्ण अभिनव विचारा मागिल मध्य रेल्वेचे श्री आलोक बोहरा, डीआयजी / आरपीएफ, म्हणाले की, “जगभरातील अनेक घटकांमधील उच्च संसर्ग दर, कोविड -१९ या साथीच्या आजारापासून सोडविण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणत आहे. ज्यामुळे रोबोटिक स्क्रीनिंगचा विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. ‘कॅप्टन अर्जुन’ स्क्रीनिंग पेक्षाही अधिक वापरासाठी तैनात केले जाऊ शकते. ते स्टेशन एक्सेस कंट्रोलमध्ये एक प्रभावी घटक आहे आणि स्टेशन सुरक्षा योजना वाढवते “

या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यशामुळे रोबोटिक ‘कॅप्टन अर्जुन’ कोणतीही मॅन्युअल व्यवस्था नसताना यशस्वीरित्या प्रवाशांना स्क्रीनिंगच्या वेळी पुरेसे संरक्षण कवच देईल आणि त्याचवेळी पाळत ठेवणे हे कुठल्याही विलक्षण घटनांसाठी प्रतिबंधक ठरणार नाही आणि रेल्वे परिसरातील सुरक्षा सुनिश्चित करेल. या नाविन्यामुळे भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या आधुनिक सुरक्षा उपायांमध्ये आणखी एक वैशिष्ट्य वाढेल.
आम्ही एकत्र कोविड 19 लढू शकतो.

Share: