मुंबई APMCचा भोंगळ कारभार,एकाच कामासाठी दोन वेळा निविदा,तीन लाखांच्या कामाची निविदा कुणाच्या भल्यासाठी?

19
0
Share:

-मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार.

-एकाच कामासाठी दोन वेळा निविदा.

-तीन लाखांच्या कामाची निविदा कुणाच्या भल्यासाठी?

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यानिमित्ताने भ्रष्टाचाराचा नवा प्रकार समोर आला आहे.
दिड वर्षांपूर्वी बाजार समितीने एपीएमसीतील मार्केट 1 मधील फेज 2 मध्ये विकास कामांसाठी 7 कोटी 17 लाख 42 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली होती. या निविदेत समावेश असलेली कामे 18 महिन्यात पूर्ण करायची आहेत. कामे सुरु होवून 10 महिने होत आले आहेत. परंतु अद्याप केवळ 30 टक्केच कामे झाली आहेत.

या कामात समावेश असलेल्या कामांपैकी एका कामाची निविदा पुन्हा बाजार समितीने काढली आहे. मार्केट 1 मधील फेज 2 मधील सी. डी. एफ. जी. एच. व के. ब्लाँकच्या मध्य रस्त्यालगतच्या मुख्य पॅसेज समोरील फुटपाथच्या भागात कॉक्रीटीकरण करण्यासाठी 2 लाख 91 हजार रुपयांची ही निविदा काढण्यात आली आहे.
मुळातच या कामाचा समावेश काम दिड वर्षांपूर्वी काढलेल्या निविदेत आहे. तरीदेखील बाजार समितीने ही निविदा काढून कुणाच्या तिजोरीत भर टाकण्याचा खटाटोप चालवला आहे याबद्दल एपीएमसी वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
यानिमित्ताने बाजार समितीच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे.

 

Share: