मुंबई APMC मध्ये फेकलेल्या भाजीपाला निवडून फेरीवाला कडून विक्री, APMC स्वछता अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष

5
0
Share:

नवी मुंबई:सध्या सुरु असलेल्या देशव्यापीच्या काळात कोरोना विषाणूबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे त्यामुळे सर्व ठिकाणी बाजारपेठ बंद असल्याने भाज्यांची किरकोल दुकाने सुद्धा बंद आहे त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना मिळेल त्या स्वरूपात मिळेल त्याठिकानावरून भाजी खरीदी करायला लागत आहे पण काही विक्रेते एपीएमसी भाजीपाला बाजारातीळ खराब झालेली भाजी निवडून आणून बिकत आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण होत आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये शनिवारी व्यापाऱ्यानी 1200 गाड्या भाजीपला मागवले होते त्यामध्ये 60 टक्के भाजीपला शिलक राहिले होते हे भाज्यांमध्ये कोबी,बिंच, कारला, भिंडी,इत्यादी भाज्या मोठा प्रमाणात सडलेले आहेत ,सडलेले भाज्या व्यापारी बाहेर फेकायला ऐवजी आपल्या दुकानासमोर गटारात टाकले होते या सडलेले भाजीपाल्याला किडे लागलेले आहेत या भाजीपला मधून मुंबई,ठाणे व नवी मुंबई मध्ये किरकोळ व्यापार करणाऱ्या फेरीवाले उचलून गाड्या मध्ये भरताना पाहायला मिळाले आहेत,

ह्या सडलेले भाजीपला तुमचे आमचे घरी जाणार आहेत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कामाला लागले आहेत मात्र बाजारसमिती स्वछता अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत .

भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही घेतलेली भाजी ही सडलेले आणि गटारात फेकण्यात आलेल्या भाजीपला आहेत असे दृशय भाजीपला बाजारात पाहायला मिळाले.

Share: