Corona Breaking: मुंब्र्यात तब्लिगींवर मोठी कारवाई, 25 जण अटकेत, मलेशिया, बांगलादेशींचा समावेश

5
0
Share:

मुंब्र्यात तब्लिगींवर मोठी कारवाई, 25 जण अटकेत, मलेशिया, बांगलादेशींचा समावेश

ठाणे:मरकजप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ठाण्याच्या मुंब्रा डायघर भागातून 25 तब्लिगींना अटक केली आहे. यामध्ये बांगलादेश आणि मलेशियाच्या नागरिकांचादेखील समावेश आहे. ठाणे गुन्हे शाखा 1 कडून ही कारवाई करण्यात आली आहे .

मुंब्रा डायघर येथील अटक करण्यात आलेल्या 25 तब्लिगींना गुन्हे शाखेने आज कोर्टात हजर केले असता कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मरकज येथून आल्यानंतर हे 25 जण मदरसा आणि शाळेत राहिले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांचे रिपोट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये काही बांग्लादेश आणि मलेशियाचे नागरिक आहेत.

मुंब्र्यातील अल नदिउल फला या शाळेच्या चार विश्वास्थावर 8 परकीय नागरिक आणि 2 भारतीय यांची कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोपाखाली तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या विश्वास्थनावरदेखील 13 परकीय नागरीक ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या मुब्रा भागातील एका मशिदीमधून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियाच्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं होतं. यातील काही जण 10 मार्चला निजामुद्दीन या ठिकावरुन आले होते.

क्वारंटाईनदरम्यान त्यांची दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही वेळा टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हे सर्व लोक मशिदीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचा संपर्क लोकांशी आला नाही. त्याचबरोबर सुदैवाने मरकज कार्यक्रमाशी त्यांचा काही संबंध नाही. कारण ते 10 मार्चच्या आधी परतले होते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

Share: