Corona virus update:मुंबईत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद, मृतांचा आकडा 92 वर गेला आहे

21
0
Share:

-मुंबईत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद, मृतांचा आकडा 92 वर गेला आहे

-मुंबईत आज आत्तापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

– 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे

मुंबई-देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1298 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे (Highest Corona death toll in Mumbai). आज मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळेच मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने परिसर सील बंदही केला आहे.

मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट लक्षात घेता राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनानं मुंबईतील चार विभाग हे अतिगंभीर म्हणून घोषित केले आहेत. यापैकी जी साऊथमध्ये लोअर परेल आणि वरळीचा परिसर, ई वॉर्डमध्ये भायखळा, भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग, डी वॉर्डमध्ये नाना चौक ते मलबार हिल परिसर आणि के वेस्ट वार्डात अंधेरी पश्चिमचा भाग यांचा समावेश आहे. आता हे चारही विभाग संपूर्णपणे सील करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज एम ई आणि एच ई वार्डात कोरोना रुग्णांच्या संख्येत बरिच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यावरही आरोग्य यंत्रणांचं विशेष लक्ष आहे.
मुंबईच्या जी साऊथ वार्डातील कोरोना रुग्णांची संख्या 246 पर्यंत पोहचली आहे. ई वार्डात 111, डी वार्डात 94, के वेस्ट वार्डात 61 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एम ,ई मध्ये 70 एच ई वार्डात 67 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.

Share: