कोरोनामुळे देश चिंतेत ! उद्धव ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

8
0
Share:

मुंबई, 31 डिसेंबर नववर्षाच स्वागत सर्वांनी केले पाहिजे. पण रात्री 11 नंतर हाॅटेल्स पब्स बंद राहील. मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथे गर्दी करू नये, चार पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
30 डिसेंबर ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानं आता देशातही शिरकाव केला आहे. देशात जवळपास 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नव्या कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे देशासह राज्यात भीती पसरली आहे. मात्र, राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही, असही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले तर देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन, लंडनला जाणारी विमानसेवा स्थगित केली होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता युकेला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण 7 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आलं आहे.

Share: