Coronavirus Breaking: पुण्यात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, किराणा, भाजीपाला, चिकन-मटण दुकानं बंद

पुण्यात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, किराणा, भाजीपाला, चिकन-मटण दुकानं बंद
-पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत.
– 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मे पर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत.
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 1 हजार 125 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 82 जणांना आपाल जीव गमवावा लागला आहे. सर्वतोपरी प्रयत्न करुनही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोटकोरपणे पालन व्हावे यासाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत.
पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 मे पर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत. सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळं, चिकन, मटण, अंडी यांची विक्री, दुकानं वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. तर घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वेळेच बंधन असेल. मात्र दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत .
पुण्यातील ‘या’ भागात अतिरिक्त निर्बंध
परिमंडळ 1
1) समर्थ पोलीस स्टेशन
2) खडक पोलीस स्टेशन
3)फरासखाना पोलीस स्टेशन
परिमंडळ 2
1)स्वारगेट पोलीस स्टेशन
गुलटेकडी,
महर्षीनगर झोपडपट्टी परिसर,
डायस प्लॉट,
इंदिरानगर,
खड्डा झोपडपट्टी
2)लष्कर पोलीस स्टेशन
नवीन मोदीखाना
पूना कॉलेज रोड,
मोदीखाना कुरेशी मस्जिद,
भीमपुरा लेन,
बाबाजान दर्गा,
शिवाजी मार्केट
शितलादेवी मंदिर,
3)बंडगार्डन पोलीस स्टेशन
ताडीवाला रस्ता
4) सहकार नगर पोलीस स्टेशन
तळजाई वसाहत
बालाजीनगर
परिमंडळ 3
1) दत्तवाडी पोलीस स्टेशन
2) पर्वती दर्शन परिसर,
परिमंडळ 4
1) येरवडा पोलीस स्टेशन
लक्ष्मी नगर
गाडीतळ
चित्रा चौक परिसर
2) खडकी पोलीस स्टेशन
पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर
इराणी वस्ती पाटकर प्लॉट
पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागू होण्याची ही दुसरी वेळ
पुण्यात यापूर्वीही दोन दिवसांसाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यात 22 ते 23 एप्रिलदरम्यान अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निर्बंध लागू करण्यात आले होते.