Coronavirus Breaking:एपीएमसीत धान्य मार्केटमधील आणखी एका व्यापाऱ्याला कोरोना

24
0
Share:

नवी मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला आहे .मुंबई एपीएमसी मध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाली आहे दोन दिवसात मुंबई एपीएमसी मधील भाजीपला व्यापारी, फळ मार्केट मध्ये सुरक्षा अधिकारी व धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोना लागण झाल्यानं बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसरीकडे  मार्केटमध्ये काही व्यापारी कोरोनाचा फायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य, डाळी ,भाजीपाला व फळ मागवत आहेत.

मंगळवारी( 28 एप्रिल) रोजी एपीएमसीतील धान्य बाजारातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित होणारा एपीएमसीतीला हा सहावा  आहे. हा व्यापारी धान्य मार्केटच्या G विंग मधील व्यापार करत होता ,कोपरखेरने मधील रहिवासी आहे. याआधी L विंग मधील व्यपऱ्याला कोरोनाचे लागण झाली होती,याआधी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला,एक हॉटेल कर्मचाऱ्यांना,एक भाजीपला व्यापारी, एक फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकारीला कोरोना लागण झाली आहे .नवी मुंबईत कोरोना रुग्णची संख्या झपाट्याने वाढत आहे यामध्ये असे दिसून येत आहे की समूह संसर्ग मुळे बाजारात आता कोरोना रुग्ण पसरली आहे।
सोमवारी भाजीपला व्यापारी, फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकारी ला कोरोना रुग्ण आढळले होते मंगळवारी धान्य मार्केट मध्ये व्यपऱ्याला कोरोना रुग्ण आढल्याने व्यापारी,ग्राहक ,माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक मध्ये भित्ती निर्माण झाली आहे .एपीएमसी मध्ये कोरोनाची गुणाकार सुरू झाल्याने नवी मुंबईकरांना डोकेदुखी वाढणार आहे सध्या कोरोनाबाधित रुग्णची संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल,ग्राहक,माथाडी कामगार व सुरक्षा कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू झाले आहे.

Share: