Coronavirus Breaking: नवी मुंबईचा आकडा 592 वर; एकट्या एपीएमसीत 225 बाधित

21
0
Share:

*नवी मुंबईचा आकडा 592 वर; एकट्या एपीएमसीत 225 बाधित*

नवी मुंबई -दिवसेंदिवस नवी मुंबईची चिंता वाढतच आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 592 कोरोनाबाधीत सापडले आहेत. शनिवारी महापालिकेस प्राप्त झालेल्या प्रलंबित 356 कोरोना चाचण्यांपैकी 272 अहवाल निगेटिव्ह आले असून 65 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवी मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या 592 झाली असून 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या एपीएमसीतून तुमचा आमचा भाजीपाला येतो तेथील रुग्णांची संख्या 225 झाली आहे.

शनिवारी आढळून आलेल्या एकूण करोना रुग्णांपैकी नेरूळ-15, वाशी-9, तुर्भे-21, ऐरोली-5, दिघा – 1,बेलापूर-1 घणसोली- 5 व कोपरखैरणे येथील 8 रुग्णांचा समावेश आहे.
महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमध्ये व्यपारी, माथाडी कामगार,परप्रांतीय कामगार व एपीएमसी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधून 40 जणांना कोरोनाचे लागण झाली आहे , महापालिकच्या अहवाल मध्ये तीन दिवसांपासून मार्केट मध्ये राहणारे व एपीएमसी संबंधित रुग्णची संख्या 225 झाली आहे.त्यामुळे सोमवारी 11 ते 17 मे पर्यंत पाचही मार्केट बंद करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
मार्केट बंद होऊन सुद्धा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात एपीएमसीच्या पाचही मार्केट बंद करून बाजारसमितीमधील धान्य,फळे,भाजीपला,कांदा बटाटा व मसाला मार्केट मधील सर्व गाळे,इमारती,शौचालय, रस्त्याची साफसफाई, निर्जंतुकीकरण करून मार्केट पूर्ववत सुरू करण्यासाठी तयारी होत आहे. मात्र दुसरीकडे एपीएमसीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यासाठी प्रशासना याकडे लक्ष द्यायला हवं अशी प्रतिक्रिया नवी मुंबई नागरिकांनी दिली आहे .

कोकण आयुक्त व एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी बाजारात कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून सुद्धा बाजारात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे एपीएमसी मार्केट 15 दिवस लॉकडाऊन करण्याची गरजेचे आहे .
नवी मुंबईत गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण 400 वर गेला असून यात एपीएमसी मार्केट मधील संसर्गाच 225 रुग्ण झाल्याने नवी मुंबईकरांना झोप उडाली आहे.येथून नवी मुंबई,मुंबई, ठाणे,कल्याण डोंबिवली येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्याची संसर्ग पोहचत असल्याचे समोर आली आहे,वेंगुर्ले येथील हापूस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व क्लिनरला कोरोनाचे लागण झाली आहे.

आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसी मार्केट मधून अर्थररोड जेल,कोलवा नेव्ही नगर कॉलोनी, तळोजा CISF कॅम्प असे विविध ठिकाणी भाजीपाला ,मसाले,कडधान्य जात आहे.सध्या कोरोनाचे कोहराम अर्थररोड जेल,नेव्ही वेस ,सीआईएसफ मध्ये पसरलेले आहेत या मध्ये कैदी पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे .एपीएमसी मार्केट मध्ये दीड महिन्यापासून कोरोनाचे प्रादुर्भाव पसरले आहे यामध्ये असे दिसून येत आहे की मार्केट मधून जाणाऱ्या कडधान्य व भाजीपला मुळे जेलमध्ये कैद्यांना व जेल कर्मचाऱ्यांना कोरोना लागण होऊ शकते.

शनिवारीमहापालिकेच्या अहवालात 65 रुग्णामध्ये एपीएमसीत 25 जणांना कोरोनाचे लागण होते त्यामध्ये  व्यापारी,  सुरक्षा कर्मचारी, एपीएमसी कर्मचारी, फळ व भाजीपाला मार्केट मध्ये काम करणाऱ्या  कामगारांच्या कोरोनाची लागण झाली आहे.तसेच महापालिका आरोग्य विभागातील विविध नागरी आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या  अधिकारी व कर्मचाऱ्याना कोरोना झाल्याने आरोग्य खात्यात भीती निर्माण झाली आहे.यामध्ये एपीएमसी मुळे 225 रुग्ण वाढली आहे ह्या आकडा अजून वाढू शकतो.

सगळे कोरोनाबाधित रुग्ण मुंबईच्या हॉटस्पॉटमधून व एपीएमसी मध्ये ये जा करणाऱ्या व्यपारी,ग्राहक,माथाडी कामगार व परप्रांतीय कामगारमुळे आता एपीएमसी मार्केट मध्ये कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत आहेत,एपीएमसी मध्ये रुग्ण वाढल्याने नवी मुंबईच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहेत .त्यामुळे नवी मुंबई नागरिकांनी सोशल मीडियावर” क्लोज एपीएमसी, सेव्ह नवी मुंबई” मोहीम रावले असून प्रशासनाने एपीएमसीच्या पाचही मार्केट आठ दिवस बंद करण्यात निर्णय घेतले आहे. पालिकेतर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना करून सुद्धा बाजारात दिवसेंदिवस रुग्ण वाढत होते,नवी मुंबईतील हॉटस्पॉट आणि सगळे जास्त कोरोना पजिटीव्ही रुग्ण असलेल्या वाशी नंतर आता एपीएमसी मार्केट झाली आहे .महापालिका तर्फे 120 जागे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे .महानगर पालिकाला चिंतेत वातावरण आहे.मुंबई मधून नवी मुंबई व एपीएमसी मार्केट मध्ये ये जा करणाऱ्या व्यापाऱ्या मूळ रुग्ण वाढली अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ यांनी दिली आहे .

कोव्हीड 19 रुग्णची तपशील खालील प्रमाणे

-कोरोना चाचणी केलेल्या नागरिक संख्या-6266
-पोजिटीव्ह-592
-निगेटिव्ह-4113
-प्रलंबित-1617
-वाशी येथील कोरोना केयर येथील नागरिक संख्या-91
-इंडियाबुल्स मध्ये कोरोना केयर नागरिक संख्या-979
-घरातील क्वारंटइन असलेल्या व्यक्ती-8399
– वाशी येथील कोव्हीड 19 विशेष रुग्णालयात येथे दाखल-59
-कोरोनामुळे मृत्यूची संख्या-12
-कंटेन्मेंट क्षेत्र-120

-मुंबई एपीएमसी मध्ये एकूण कोरोना रुग्णची संख्या 225 वर पोहचले आहेत

(Mumbai Apmc Hotspot)

Share: