Coronavirus Breaking: कोरोनाच्या संकटात एपीएमसी अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती !, चौकशी टाळण्याचा प्रयन्त – 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले अर्ज

26
0
Share:

अधीक्षक अभियंता विलास विरादार, सह सचिव अविनाश देशपांडे यांच्यासह सुरक्षा विभाग, अभियंता विभाग , प्रशासन,भाजीपला ,फळ मार्केट भागातील काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी दिले अर्ज.

नवी मुंबई – राज्यासह देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. या परिथिती मध्ये आपत्कालीन यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. त्यात शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशात काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जबाबदारीतून पळ काढू पाहत असल्याचे एपीएमसी मध्ये दिसून येत आहे.( Voluntary Retirement of APMC Officers in Corona Crisis !,)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊननंतर अन्य कोणत्याही कामांना प्राधान्य न देता सर्वत्र कोरोनवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई एपीएमसतील कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या असताना कोरोनाचा भीतीमुळे जवळपास 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला. यामध्ये अधीक्षक अभियंता विलास विरादार, सह सचिव अविनाश देशपांडे यांच्यासह सुरक्षा विभाग, अभियंता विभाग , प्रशासन,भाजीपला मार्केट,फळ मार्केट भागातील काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या समावेश आहेत.
देशात कोरोनाचे रुग्ण सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.13 मार्च पासून साथरोग कायद्यही लागू झाला आहे.एपीएमसी मध्ये विविध कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संदर्भात जबाबदारी दिली आहे .जसे जसे कोरोना चे कहर सुरू झाली तसे तसे एपीएमसी मधील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वेच्छानिवृत्ती साठी अर्ज दिला आहे. एपीएमसी मध्ये पाच मार्केट मधील येणाऱ्या गाड्याला सॅनिटायझर करणे, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देखभाल करणे,आवक जावक वर नजर ठेवणे या साठी रात्र दिवस एपीएमसीचे प्रशासक व सचिव काम पाहत आहेत. मात्र काही अधिकारी व कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या फायदासाठी स्वेच्छानिबृत्तीसाठी अर्ज दिले आहेत. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा महामारी मध्ये काम करायचं नाही असे दिसून येत आहे. मात्र त्यांच्या नजरा एपीएमसीच्या तिजोरीवर असल्याचेही बोलले जात आहे.
एपीएमसीच्या तिजोरीतुन कोट्यवधी रुपये खाली होऊन आर्थिक परिस्थिती कोलमोडणार असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता भारतामध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर होऊन लाखो लोकांच्या रोजगार जातील त्यामुळे केंद्र सरकारने DA दीड वर्षासाठी स्थगित दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगार दिला आहे, अशी परिस्थिती असतानाही एपीएमसीच्या काही अधिकारी व कर्मचारी यांनी निवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. पूर्ण भारतात आणीबाणीची परिस्थिती असल्याने स्वेच्छानिवृत्ती बंद असताना केवळ एपीएमसी मध्ये सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र कांम करणाऱ्या अधिकारी व कारभारी मध्ये नाराजी व्यक्त केले जात आहेत.
विशेष म्हणजे निवृत्तीसाठी जे अधिकारी व कर्मचारी यांनी अर्ज दिले आहेत. त्यापैकी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारच्या तक्रार आहेत. या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा एपीएमसी मध्ये आहे. परंतु त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यास मागील काही महिन्यात एपीएमसी मध्ये घडलेले अनेक घोटाळे दडपले जातील याचीही शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया
एपीएमसी मध्ये कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर काम सुरू आहे ,काही अधिकारी व कर्मचाऱ्यांने स्वेच्छानिवृत्तीसाठी जे अर्ज केले आहे त्यावर आता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आली नाही.
-अनिल चव्हाण-प्रशासक व सचिव (मुंबई एपीएमसी)

(Voluntary Retirement of APMC Officers in Corona Crisis !,)

Share: