सीताफळ लागवड व छाटणी तंत्र

86
0
Share:

सिताफळ हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटीबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून शतकाच्या अखेरीस याची आयात भारतात पोर्तुगीजांनी केली आहे. हा वृक्ष भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली क्षेत्र आहे. त्यात सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असून या कोरडवाहू फळझाडाची  लागवड जळगाव, बीड, दौलताबाद (औरंगाबाद), अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा इ. जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त व हलक्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केली जाते.

सिताफळाचे उपयोग:

सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळामध्‍ये खनिजद्रव्‍ये आणि जीवनसत्‍वे उपलब्‍ध करून देण्‍याची चांगली क्षमता असल्‍यामुळे ते एक पुरक फळ आहे. सिताफळाच्‍या ताज्या 100 ग्रॅम गरात पुढीलप्रमाणे अन्‍नघटक द्रव्‍यांचा समावेश होतो. पाणी (73.30 %), प्रथिने (1.60 %), खनिजे     (0.70 %), पिष्‍टमय पदार्थ (23.50 %), चुना (0.20 %), स्‍फुरद (0.47 %), लोह (1.00 %). सिताफळाच्‍या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.  पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. सीताफळ्याच्या फळव्यतीरिक्त त्याची मुळी उगाळून चाटल्यास ह्या समस्या म्हणजे लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग इ. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.

आवश्यक हवामान व जमीन:

कोरडे व उष्ण हवामान सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. ह्या फळपिकामध्ये पाण्याचा आणि उष्णतेचा तान सहन करण्याची क्षमता आहे. उष्ण व कोरड्या हवामानातील सिताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची, गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्याखेरीज झाडांना फळधारणा होत नाही. साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी 500-750 मिमि पाऊस आवश्यक असतो. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही.

सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्‍त भागासाठी शिफारस केली असल्‍यामुळे हे फळझाड कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्‍यंत हलक्‍या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरतात.

Share: