मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सफाई कामगार सुविधांपासून वंचित, आंनंदराज आंबेडकर यांनी घेतली सभापतींची भेट

31
0
Share:

नवी मुंबई :मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील सफाई कामगाराच्या सामाश्यांसाठी , रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बाजार समिती सभापती अशोक डक यांची भेट घेतली .आणि सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.

करोना काळात बाजार प्रशासन कडून आम्हला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळाली नाही तरी देखील आम्ही पाचही बाजार मध्ये पूर्णपणे साफ सफाईचे काम केले. करोना काळात साफ सफाईच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले . मात्र आम्हला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळाली नाही तरीदेखील आम्ही सफाई कामगार प्रामाणिकपणे काम करत आहोत. आम्हाला राज्यसरकारने सांगितल्या प्रमाणे मानधन मिळाले पाहीचे होते मात्र आता पर्यंत मिळाले नाही. आमच्यावर हा अन्याय का? असा सवाल यावेळी सर्वानी उपस्थित केला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनामध्ये २७५ सफाई कामगार आहे . हे कंत्राटी कामगार कित्येक वर्षापासून त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. सफाईचे साहित्य ,ओळखपत्र ,वाढीव पगार, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याकरता हे सर्व कामगार रिपब्लिकन कामगार सेनाच्या झेंड्याखाली लढा देत आहेत. त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अश्या सूचना यावेळी आंबेडकर यांनी केल्या.

प्रशासकीय काळात या कामगारांबाबतचे प्रश्न आणि समस्या जैसे थे असल्याचे सभापती अशोक डक यांच्या लक्षात आल्याने त्याबाबतचे चौकशीचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. एक महिनाभरात या सफाई कामगारांना आपण नक्कीच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन अशोक डक यांनी उपस्थितांना दिले.

आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कामगारांना इतर स्वराज्य संस्थाच्या पध्दतीने वेतन दिले जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महापालिकांमध्ये शहर सफाईचे काम प्रामुख्याने कंत्राटदारी पद्धतीने केले जाते त्याच बरोबर मुंबई एपीएमसी मध्ये सफाई कामगार पण कंत्राटदार खाली ककम करतात .एकदा ठेकेदारांना कचरा सफाईचे कंत्राट दिले की कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पध्दतीने वेतन मिळते का, त्यांना आरोग्य सेवा, गमबूट, मास्क तसेच अन्य अत्यावश्यक सोयी-सुविधा दिल्या जातात का, याची तपासणीही एपीएमसी प्रशासनकडून करणे गरजेचे आहे. असे मत सभापती अशोक डक यांनी व्यक्त केले आहे.

सफाई कामगारांचे प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे आहेत

*नवी मुंबई महापालिकेनुसार इथल्या सफाई कामगारांना वेतन मिळावे .
*कंत्राटी कामगारांना १ जानेवारी २०१९ पासून वाढलेल्या वेतन न देता जुन्याच पध्दतीने पगार दिला जातो.हा वाढीव पगार व फरकाची थकीत रक्कम व्याजासहित मिळावी .
*एपीएमसी मार्केटमध्ये सर्व कंत्राटी कामगारांना समान गणवेश ,शिलाई व धुलाई भत्ता असावा.
*कंत्राटी कामगारांना लागणाऱ्या साहित्य सामग्री वेळेवर मिळावी .
*कंत्राटी कामगारांना ओळखपत्र,पगार पावती व हजेरी नोंदणी रजिस्टर व्हावे.
*मासिक वेतन बँके द्वारे अदा करावा.
*कंत्राटी कामगारांचे देय द्यावे व देण्यात येणाऱ्या सुविधा कामगार कायद्यानुसार मिळावे.
*कंत्राटी कामगारांना समान ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून घ्यावे.
*कंत्राटी कामगारांना बैद्येकीय सुविधा मिळावी व त्याचे प्रत्येक वर्षी मोफत बैद्येकीय तपासणी, बैद्येकीय बिमा योजना लागू करावा.
*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजनेचा लाभ सफाई कामगार यांना मिळावा
प्रवास भाडे ,घाण भत्ता व घर भत्ता मिळावा
*सफाई कामगार /मेहतर/गवंडी/माळी कामगारांची रिक्त पदे भरावी.
*आस्थापना वरील सफाई कामगार ,मुकादम यांच्या रिक्त पदे भरण्याबाबत.
*कंत्राटी सफाई कामगारांना आपल्या स्वाक्षरीने उत्कृष्ट कामगार पुरस्कार देणे

Share: