देशभरात माथाडी कायदा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील-देवेंद्र फडणवीस

22
0
Share:

-देशभरात माथाडी कायदा लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील-देवेंद्र फडणवीस
-राज्यात पुढच्या काळात युतीचेच सरकार येणार – उद्धव ठाकरे
नवी मुंबई:आमचे सरकार सदैव माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी उभे राहणार आहे. देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठे योगदान आहे. माथाडी कायदा सर्व देशात लागू झाला पाहिजे, अशी नरेंद्र मोदी यांची इच्छा असून त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

राज्यात पुढच्या काळात युतीचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी या कार्यक्रमात केली. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. युतीबाबत जे काही गैरसमज होते ते दूर झाले आहेत.

माथाडी कामगार फक्त कामगार राहता कामा नये आता तो मालकही झाला पाहिजे.यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माथडी कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी नव्हे तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, वडाळा येथील माथाडी कामगार गृहप्रकल्पासाठी जमिनीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्वरित निकालात काढला आहे. भविष्यात या व चेंबूर गृहप्रकल्पासाठी वाढीव चटई मिळावे, माथाडी बोर्डात माथाडी कामगारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती जागतिक दर्जाची व्हावी, यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे.

Share: