देवेंद्र फडणवीसची शशिकांत शिंदेंना विनंती, तुम्ही आमच्यासोबत या पूर्ण सातारा जिल्हा संभाळा -शशिकांत शिंदे

5
0
Share:

*निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्नेहमेळावा आयोजित…*
*१९८५ पासून माथाडी कामगारांना शरद पवारांनी दिली साथ…आत्ता तुमची वेळ..आपल्या दैवताला द्या साथ* *
*कोरेगाव खटाव मतदार संघाचे उमेदवार शशिकांत शिंदेचं प्रतिपादन….*

नवी मुंबई-निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माथाडी भवनात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यामेळाव्यात राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी दिलेले खटाव कोरेगाव मतदार संघाचे शशिकांत शिंदे, ऐरिली विधानसभा मतदार संघाचे गणेश शिंदे व बेलापूर विधानसभा मतदार संघाचे अशोक गावडे उपस्थित होते. या मेळाव्यात माथाडी कामगार व व्यापारीही लक्षणीय संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित तीनही उमेदवारांनी माथाडी कामगारांना भावनिक संबोधन केले.तसेच तुम्ही जर साथ दिलीत तर आमचा विजय निश्चित असेही प्रतिसादन केले.

कोरेगाव -खटाव मतदारसंघाच्या वतीने वाशी येथील माथाडी भवनात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी, माथाडी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी खटाव-कोरेगाव मतदारसंघातचे आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.यावेळी ऐरोली मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवार गणेश शिंदेना निवडून आणणे गरजेचे आहे असे शशिकांत शिंदे म्हणाले.
ऐरोली आणि बेलापूर परिसरात लक्षणीय संख्येने माथाडी कामगार राहतात. विशेषतः या परिसरात ६० टक्के लोकसंख्या पश्चिम महाराष्ट्रातील लोक राहतात.पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक हे शरद पवारांचे चाहते आहेत त्याचा नक्कीच फायदा राष्ट्रवादीला होईल असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मला भाजप मध्ये या तुम्हाला साताऱ्याची जबाबदारी देऊ अस अमिष दिल. ४८ नगरसेवक ज्यावेळी भाजप मध्ये गेले तेव्हा मलाही ऑफर दिली ती मी सपशेल नाकारली मला लोकांनी त्रासही दिला पण मी घाबरलो नाही. असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
दोन ते पाच कोटी रुपये देऊनही उमेदवारी मिळतं नाही. पण माझ्या व खिशात पैसा नाही मी कसा लढणार ?तुला काही नाही करायचं ,समोचा माणूस पण गणेश तू पण गणेश त्यामुळे घाबरायचं नाही असा विश्वास पक्षाने दिला व मी त्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरला. असे ऐरोली मतदारसंघाचे गणेश शिंदे म्हणाले. तसेच, माझे दैवत माझ्या बरोबर आहे समोर कुणीही असू द्या मी घाबरणार नाही,गणेश शिंदेला निवडून येण्यासाठी माथाडी कामगारांची एकजुट आणि साथ असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विजय आघाडीचाच होणार.

-जे गेले ते गेले आता आहेत हे खरे कार्यकर्ते आहेत असे अशोक गावडे म्हणाले.१९८५ पासून माथाडी कामगारांना शरद पवारांनी साथ दिली आहे आत्ता तुमची वेळ आपल्या दैवताला द्या साथ कोरेगाव खटाव मतदार संघाचे उमेदवार शशिकांत शिंदेनी प्रतिपादन केलं.
आत्ताच्या युगात मशीन साथ देणार की नाही?? याचीच भीती वाटते,साहेब आम्ही जिंकलो पण मशीन वर लक्ष द्या….असेही यावेळीम्हंटले गेले.
एका प्रभागात अध्यक्ष असलेल्या गणेश शिंदेला विधानसभा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे सर्वांनी विचार करावा.
शरद पवारांच्या साथ देणाऱ्या लोकांना विविध प्रकरणांत अडकवले जाते असे षडयंत्र करण्यात येत आहे. असेही मुद्दे यावेळी मांडण्यात आले

Share: