डायबेटिसच्या रुग्णांनाही चाखता येईल आंब्याची चव.

22
0
Share:

नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजारत फळ मार्केटमध्ये साऊथ आफ्रिका येथून आयात करण्यात आलेला ‘टॉमी एटकीन’ नावाचा आंबा कमी गोड आहे. त्यामुळे हा आंबा डायबेटिसच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे.मुंबई एपीएमसी फळ बाजारात आलेल्या एक कंटेनर मध्ये साडे पांच हजार पेट्या ‘टॉमी एटकीन’ नावाचा आंबा घाऊक बाजारात 300 रुपये किलो या दरात बिकला जात आहे एक पेट्या मध्ये 4 किलो आंबा येत आहे.या पूर्वी दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस आंबा मार्केट मध्ये आला होता आता सिजन संपल्या मुले ही आंबा निर्यात करण्यात आली आहे.अवकाळी पावसामुळे आपल्या कोकणचा राजा असणाऱ्या हापूस आंब्या आता उशीर होनार त्यामुळे दक्षिण आफ्रिकाचा आंबा मार्केट मध्ये बिकनार घाऊक ब्यापारी संजय पानसरे सांगितले प्रमाणे  दक्षिण आफ्रिकेतील टॉमी एटकीन  आंब्याची चव मिडियम आहे युरोप देशात लोक जास्त प्रमाणे टॉमी आंबा खतात त्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. यापूर्वी देखील दक्षिण आफ्रिकेतील मालावी हापूस आंब्याची  आवक झाली होती. यंदा ह्या आंबा आल्याने आणखी तीन महिने या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.

Share: