राज्य सरकारकडून फार अपेक्षा करू नका; केंद्र सरकारला जास्त अधिकार : शरद पवार

10
0
Share:

 

नाशिक: राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कांद्याच्या लिलावासाठी व्यापाऱ्यांचा विरोध होत आहे. तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. लासलगाव, पिंपळगावसह सर्वच ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद आहेत. या सर्वसंबंधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये कांदा उत्पादकांची बैठक घेतली आहे.

“व्यापाऱ्यांना होत असलेला त्रास त्यांनी शेतकऱ्यांना देऊ नये, तसेच राज्य सरकारकडून फार अपेक्षा करू नका. केंद्र सरकारला जास्त अधिकार आहेत. निर्याती संबंधी माहिती ही राज्य सरकारची नाही. कांदा प्रश्नाचा सर्व निकाल हा केंद्रात होतो”, असे शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. मात्र “कांद्याच्या या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला जाण्यापूर्वी केंद्रांकडे जाऊन आपण संबंधित केंद्रीय मंत्र्यांना भेटणार” असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. परंतु या संबंधी “कांदा विकत घेऊन रेशनिंगमध्ये विकण्याची व केंद्राने कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नये”. अशा प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

Share: