राज्यातल्या आणखीन साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळ सवलती लागू

21
0
Share:

खरीप हंगाम 2018 मध्ये राज्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित 4518 गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या गावांमध्ये दुष्काळ उपाययोजनांच्या सवलती देण्यात येणार आहे आणखीन साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविणार आहे. केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्यातील 151 तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त राज्यातील या महसूल मंडळाने जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या याच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी वजनाच्या पर्जन्यमानाच्या 750 मिली पेक्षा कमी झाला आहे अशा 268 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत 750 मिलिमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 931 गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या गावांमध्येही आठ उपाय योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे या यादीत आलेल्या परंतु जनतेची व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या व अद्याप
दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 4518 गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळी उपाययोजनांच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share: