कृषी क्षेत्रामुळे तरुणाईला सापडतोय रोजगाराचा राजमार्ग

7
0
Share:

दिपाली  बोडवे  – apmcnews.com

अकोला : कोरोना या जागतिक संकट समयी सगळी जनता घरी बसून आहे त्यांना धड कामाला ही जाता येत नाही. आजपर्यंत बोलले जात होते की शेती शिवाय गत्यंतर नाही…. आणि आज हे कोरोनाने खरे करून दाखवले.(Agricultural sector, the youth are finding employment)

जगातील सर्वेच क्षेत्र आज या संकटामुळे स्थिर झाली आहे पण कृषी क्षेत्र मात्र नोकरी व व्यवसायासाठी भक्कम पाया ठरला आहे. त्यामुळे कृषी शिक्षण हे पुढील भविष्यासाठी मोठा खजिना ठरत आहे असे प्रत्येकाला वाटत आहे.
यामुळे तरुण पिढीने देखील कृषी शिक्षणाकडे आपला कल वाढवला आहे.शेतीच्या उत्पादकतेवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.शेतीच्या उत्पादकतेमध्ये भरभराट होण्यासाठी कृषी व कृषीसंलग्न विषयातील शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.शेतीच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.(Due to the agricultural sector, the youth are finding employment)

Share: