वाशी एपीएमसी येथील अभियंता भर्ती घोटाला

7
0
Share:

वाशी एपीएमसी येथील अभियंता भर्ती घोटाला,
-जनतेच्या पैशावरुन कोटया रूपयांची बर्बादी,
-राष्ट्रपति पासून राज्यपाल, मुख्यमंत्री, पणन मंत्र्या आणि इतर अधिकाऱ्यांना अर्ज लिहून फर्जी अभियंतावर निलंबनाची कारवाई आणि दिलेल्या पगारची वसूली करण्याची मागणी

वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भर्ती कायद्याच्या उल्लंघन करून फर्जी अनुभवपत्र आणि फर्जी दस्ताएवज वरुन जूनियर अभियंता या पदावर करण्यात आलेली नियुक्ति घोटालेच्या भंडाफोड़ झाला आहे. ही माहिती आरटीआई कार्यकर्ता अनर्जित चौहान यांनी दिली आहे. चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेली ही भर्ती व नियुक्तिमुळे लाभान्वित झालेले एपीएमसीचे बरेच अभियंताना निलंबित करणे आणि त्यांना दिलेल्या करोडो रूपयांचे पगार आणि भत्ते परत वसूल करण्याची मागणी वरुन एपीएमसी बाजार समितित खलबल माजली आहे.

चौहान यांनी सांगितल्या प्रमाणे जूनियर अभियंता (सिविल) या चार पदांवर भर्ती व नियुक्ति साठी दिनांक 07.06.1997 रोजी सकाळ पेपर मध्ये एपीएमसीच्या बतीने जाहिरात छापण्यात आला होता. या जाहिरातमध्ये चार वर्षाच्या अनुभव ठेवलेले आणि भर्ती व नियुक्तिची सर्व नियमांची पूर्ति करणारे आवेदकांना ही नौकरी देण्याचा उल्लेख होता. चौहान यांच्या प्रमाणे जाहिरातमध्ये नियमांची उल्लेख केल्यानंतर सुद्धा बोगस कागजात आणि काही पेपर आधारे अपात्र आवेदकांना नौकरी देण्यात आली होती त्यामुळे या भर्ती मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई झोपड़पट्टी सुधार मंडळचे सभापति विजय नाहटा एपीएमसी मार्केट परिसरात पाहण्या केले होते. या दरम्यान त्यांनी बाजार समिति अधिकाऱ्याची बरोबर चर्चा केली,एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केट फळ व भाजीपाला मार्केटचे बांधकाम जुने झाले आहे. अनेक ठिकाणी बांधकामाला तडे गेले आहेत आणि टेकू लावण्यात आली आहे.या अभियंतानी कांदा बटाटा मध्ये जी टेकू लावली आहे त्या मध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाली आहे , विजय नाहटा यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगितले की मार्केट मध्ये होणाऱ्या वाहतूककोंडी, सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा नाहीतर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईन, दुसरी कडे आज पूर्ण एपीएमसी मार्केट मध्ये पाणी तुंबले आहे थोडया पावस पडले की एपीएमसी मार्केट पूर्ण पाण्याखाली जातात . त्याच बरोबर पूर्ण बाजार समिति परीसरात सर्वठिकाणी कचरे पसरले आहेत.इथे येणाऱ्या शेतकरी व ग्राहक यांना पाण्यात जाउन लागतात . मार्केट मध्ये ब्यापार करणाऱ्या ब्यापारी म्हणतात आम्ही एपीएमसीला टॅक्स देतो पण एपीएमसी आम्हाला कुठला प्रकारची सुविधा देत नाही त्यामुळे आम्हला मोठ्या नुकसान होतो.या सगळे गोष्टी मध्ये असे दिसून येत आहे कि पूर्णपणे नियोजन नसल्याने हा प्रकार घडतो. फर्जी डिग्रीच्या आधारे मोठ्या पदावर वसलेल्या बोगस अभियंता मुले असा समस्या उत्पन्न होत आहे .याची जवाबदार कोण असे सवाल येथे ब्यापार करणाऱ्या ब्यापारी,माथाडी मजदूर आणि ट्रान्सपोर्टर करत आहेत।

Share: