कोरोना काळात शेतकरी आत्महत्तेच्या वाटेवर !

Share:

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन आहे. सलग तीन लॉकडाऊनमध्ये शेतकरी घरीच असल्यामुळे शेतकरी आत्महत्यामंध्ये कमी येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि नापिकी असल्यामुळे जगावे कसे या विवंचनेत, मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी प्रश्न भर टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे व शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात आहे.

यंदाच्या खरीपात सुरुवातीला कमी पाऊस, सोयाबीनच्या वांझोट्या बियाण्यांमुळे दुबारचे संकट व नंतर ऑगस्टपासून पावसाची लागलेली रिपरिप यामुळे खरीपाचे सोयाबीन, मूग व उडीद हातचे गेले. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला व सततच्या पावसामुळे ८० टक्के पिकावर बुरशीजन्य रोगामुळे बोंडसडचे संकट उद्भवले.
यामध्ये धीर खचून शेतकरी मृत्यूचा मार्ग अबलंबित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आता शासन, प्रशासनासोबत समाजमनाने देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र निरंतरपणे कायम असून, शासनस्त मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक उपायोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याच कालावधीत २०१९ मध्ये २४५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. याच वर्षी १.१२ लाख शेतकऱ्यांना ८०८ कोटींची कर्जमाफी मिळाली असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही, हा सरत्या वर्षात जिल्ह्यास हादरा आहे.

Share: