शेतकऱ्यांनी ऊसाला 4 हजार रुपये बाजार घेतल्या शिवाय ऊस देऊ नये – शेतकरी नेते रधुनाथ दादा पाटील

19
0
Share:

शेतकऱ्यांनी ऊसाला 4 हजार रुपये बाजार घेतल्या शिवाय ऊस देऊ नये – शेतकरी नेते रधुनाथ दादा पाटील

सांगली – सरकार,कारखांदार आणि राजू शेट्टी यांची संघटना, हे एकत्रितपने शेतकऱ्यांच्या लुतिचा डाव करीत आहेत. आणि शेतकऱ्यांना फसवन्याचे काम करीत आहेत. त्यामुळे गुजरात आणि उत्तर प्रदेश मध्ये ऊसाला चांगला भाव मिळतो, पण महाराष्ट्रात 2750 हा FRP आहे. आम्ही FRP अधिक 100 रूपये ही जी भूमिका घेतली जात आहे,ती म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
ऊसाच्या टनाला 4 हजार रूपये बाजार मिळाल्या शिवाय आम्ही शेतकऱ्यांना ऊस तोडू देणार नाही, तसेच
12 डिसेंबर रोजी हुतात्मा बाबू गेनू स्मृति दिन असतो त्या दिवशी आम्ही ऊस आंदोलनाची दिशा ठरवनार, आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या
ऊसाला प्रति टन 4 हजार रूपये भाव दया नाहीतर उसाच्या कारखान्याची तसेच अंतराची अट काढून टाका, अंतराच्या अटी मुळे भ्रष्ठ आणि अकार्यक्षम कारखादारांना संरक्षण मिळाले आहे. अंतराची अट रद्द झाली पाहिजे.
कारखान्यामधल्या अंतराची अट रद्द करण्यासाठी खासदार असताना राजू शेट्टी यांनी कधी शब्द उच्चारला नाही.
कारण कारखादारांच्या जीवावर राजू शेट्टी खासदार झाले आहेत, आता तर उघडच कारखांदारांच्या मांड़ीला मांडी लावून बसत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी 4 हजार रूपये बाजर घेतल्याशिवाय ऊस देवु नये नाहीतर आम्ही 12डिसेंबर पासून आंदोलन सुरु करणार- असे शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटिल.यांनी सांगितले आहे.

Share: